कल्याण तालुक्यातील बावीस जिप शाळेतील शिक्षकांची वेतनवाढ रोखली, बदलीसाठी बोगस व बनावट कागदपत्रे प्रकरण?
कल्याण (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्या परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सुमारे 64 शिक्षकांनी आॅनलाईनच्या जिल्हातंर्गत बदल्या साठी बनावट व बोगस कागदपत्रे जोडून शहराजवळील शाळा मिळवल्या ख-या परंतु तक्रारी नंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून हा घोळ उघड होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची रद्द करण्याचे आदेश दिले त्यानुसार कल्याण तालुक्यातील तब्बल 22 शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली असून इतरही तालुक्यात अशीच कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सुमारे 64 शिक्षकांनी आॅनलाईनच्या जिल्हातंर्गत बदल्या साठी बनावट वैद्यकीय कागदपत्रे, व खोटी आणि चुकीची माहिती भरुन शहरा जवळील सोयीच्या शाळा मिळवल्या यामध्ये अंबरनाथ 10, भिवंडी 18, मुरबाड 9,शहापूर 5,आणि कल्याण 22 शिक्षकांचा समावेश आहे त्यामुळे यांच्या या बनावटगिरी /420 गिरी मूळे शहराजवळच्या शाळासाठी पात्र असणाऱ्या अन्य शिक्षकावर अन्याय झाला होता या विरोधात आवाज उठवल्यानंतर याची कोकण विभागीय आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी अशा शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात येवून त्यांची नोंद सर्विस बुक्कात घेण्याचे आदेश या पाच तालुक्यातील गटशिक्षणाधिका-याना दिले होते. त्यानुसार कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला अतरगे मॅडम यांनी तालुक्यातील पिंपळोली, निळजे, पिंपरी, दहागाव, भंडार्ली, अंतरली, खोणी, बापसई, घारीवली, मामणोली, मामणोली, वावेघर, घोटसई, नांदीवलीपाडा, पावशेपाडा, गुरवली, आंबिवली आन्हे, उत्तरशिव, नडगाव २,हे आदी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची जुलै महिन्याची वेतनवाढ रोखली आहे.
मुरबाड मधील आंबोळे खु!, खाडेची वाडी, पोटगाव, सरळगाव, किसळ, कुडवली, पवाळे, शिरगाव, मुरबाड २,शहापूरातील दळखण नः१, नेहरोली, टेंभरे खु /, आसनगाव १,आवाळे, भिवंडी तालुक्यातील अंजूरफाटा, केवणीदिवे, गोवे, दापोडे, अलिमघर, दिवे अंजूर, फिंरगेपाडा, सरवली, इताडे, वेळे, खोणी उर्दू, काल्हेर, जानवळ, आमणेपाडा, गणेशपुरी, अशा एकूण ६४ शाळा आहेत.
अशीच कारवाई अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर गटशिक्षणाधिकारी यांनी केली असल्याचे समजते.
विशेष म्हणजे अशी बनावटगिरी करणा-या शिक्षकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी यामुळे अशी प्रमाणपत्र देणारे डॉक्टरांची साखळी समोर आली असती. असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. तर स्वतः च्या सोईसाठी शासनाची फसवणूक करणारे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार असा संताजनक सवाल पालक विचारत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे आदीवाशी वाड्या वस्त्या मधील शाळेत वाहनाची सोय नसल्याने रस्ता तुडवित जाणाऱ्या आणि ज्यांचा वशिला नसणा-या पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांचे काय? असा प्रश्न उपस्थित करून शहराजवळील शाळेत वशिलेबाजी करून आलेल्या या "मास्तरांची" वेगळी शाळा घ्यायला हवी आणि दोषींवर कारवाई करायला हवी असे मत मनसेचे कल्याण तालुका अध्यक्ष अश्विन भोईर यांनी व्यक्त केले आहे.


No comments:
Post a Comment