Thursday, 29 January 2026

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याकडून संगणक भेट देण्यात आला. हा कार्यक्रम सुखकर्ता बंगला शेलघर येथे पार पडला. पत्रकारितेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, बातमी लेखन व माहिती संकलन अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने ही भेट देण्यात आली. यावेळी संगणक विभागाचे तज्ञ आनंद ठाकूर उपस्थित होते.यावेळी पत्रकार हेमंत चव्हाण यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.  सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते. पत्रकार हेमंत चव्हाण यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...