Thursday, 2 July 2020

कल्याण डोंबीवली महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात उभारले जाणार किमान १ विलगीकरण कक्ष !!

कल्याण डोंबीवली महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात उभारले जाणार किमान १ विलगीकरण कक्ष !! 


"डोबिवलीच्या बंदिस्त क्रीडा संकुलात उभारले जात आहे सुमारे एक हजार बेडचे कोवीड रुग्णालय"

कल्याण : कल्याण डोंबीवली महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्णांनी महापालिके रुग्णालयांसह  सामंजस्व करार केलेले  खाजगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. नवीन रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे त्यातही भविष्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता महापालिका स्तरावर डोंबीवलीतील एमआयडीसी मधील बंदीस्त क्रीडा संकुलात सुमारे एक हजार बेड चे कोवीड रुग्णालय निर्माण होत आहे. याच बरोबर पालिका निर्वाचन प्रभाग क्षेत्र निहाय विलगीकरण कक्ष ही स्थापन होत असल्याची प्राथमिक माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे.

कल्याण डोंबीवली महापालिका क्षेत्रातील नवीन कोरोना रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे ही गंभीर बाब विचारात घेता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार डोंबीवली एमआयडीसी येथील बंदीस्त क्रीडा संकुलात सुमारे एक हजार बेडचे कोवीड रुग्णालय निर्माणाधिन असून हे रुग्णालय येत्या काही दिवसातच कोरोना पॉझेटीव्ह रुग्णांसाठी खुले होणार आहे.

त्याच बरोबर सध्य परिस्थितीत काही एक लक्षण न दिसणारे परंतु कोरोना पॉझेटीव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन घरीच विलगीकरण करून ठेवले जात आहे. परंतु या पद्धतीमुळेही कोरोना रुग्ण वाढीस लागत असल्याची बाब लक्षात आल्याने आता प्रत्येक प्रभागात किमान एक विलगीकरण कक्ष निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी संभाव्य विलगीकरण कक्षांसाठी आपपल्या विभागातून विलगीकरण कक्षांसाठी योग्य अशा इमारती, शाळा, सभागृहे, हॉल यांची माहीती महापालिकेच्या संबंधीत विभागाला कळविली आहे.
प्रत्येक प्रभागात निर्माण करावयाच्या विलगीकरण कक्षा साठी जागा ताब्यात घेणे, त्या ठिकाणी विज, पाणीपुरवठा, बेड आदी अत्यावश्यक बाबींची पुर्तता करण्याच्या नियोजन व्यवस्थापन पदी पालिकेतील जल - मल निस्तारण उपअभियंते अनंत मादगुंडी यांची नियुक्ती पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी २ जुलै पासुन पालिका क्षेत्रात पुन्हा एकहा कडकडीत लॉक डाऊन सुरु करण्यात आला आहे. या लॉक डाऊन ला नागरीकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच डोंबीवलीतील बंदीस्त क्रीडा संकुलात लवकरच कोवीड रुग्णालय सुरु होत आहे तर दुसऱ्या बाजुला प्रत्येक प्रभाग निहाय सुरु करण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षांमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. प्रभाग निहाय सुरु होणाऱ्या विलगीकरण कक्षाच्या अंमलबजावणी साठी स्थानिक सामाजिक सांस्कृतिक संस्था संघटनांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. या सर्व बाबींमुळे भविष्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात मदत होणार असल्याने कल्याण डोंबिवली करांसाठी प्रशासनाने उचललेले हे कोरोना युद्धातील महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
पालिकेच्या या प्रयत्नात आम जनतेने योग्य सहकार्य केल्यास कल्याण डोंबिवली परिसरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येस ब्रेक लागण्यास नक्कीच मदत होईल असे जाणकारांचे मत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...