लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या पाठपुराव्याला वीज वितरण कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद !!
पनवेल : प्रतिनिधी - लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेने वीजेच्या विविध तक्रांरींसदर्भात तसेच राज्यातील जनतेच्या विज देयकाबाबतच्या तक्रारी सविस्तरपणे लेखी पत्राद्वारे राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सादर केल्या होत्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद शासनाकडून देण्यात आला आहे.
यावेळीऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रातील मुख्य मागण्या, विज देयकातील रक्कम कमी करण्याबाबत आढावा घेणे, विज देयक भरण्यास हप्ते ठरवून देणे,आणि विज कनेक्शन न तोडणे या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यात संस्था यशस्वी झाल्याचे मत संस्थेचेराष्ट्रीय अध्यक्षडाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी व्यक्त केले असून यासंदर्भात ना. डॉ. नितीन राऊत, ना.ॲड. अनिल परब यांचे आणि राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
फोटोः संजय सोनावणे

No comments:
Post a Comment