Thursday, 16 July 2020

अॅट्रोसिटी गुन्हाच्या तपासात उदासीनता दाखवल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कडे तक्रार !!

अॅट्रोसिटी गुन्हाच्या तपासात उदासीनता दाखवल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कडे तक्रार !!


मुंबई प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील मोसारा गावातील बौद्ध समाजातील महिलांचा विनयभंग व लज्जास्पद कृत्य केल्याबद्दल येथील गावगुंड स्वप्निल पाटील व त्याचा साथीदार सागर जोशी यांच्या विरोधात भादवि तसेच अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत २१ जून रोजी गुन्हा दाखल केला असून अजूनही अटक केली नाही. 


तरी या विरोधात अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित आणि प्रदेश संघटीका प्रा. अर्चना जागुष्टे यांनी केंद्रीय राज्यमंत्री नाम. रामदास आठवले (सामाजिक न्याय व अधिकारिता) भारत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.  


पोलिसांच्या तपासाबाबत संशय व्यक्त केला असून तपास अधिकारी बदलून यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे.  या बाबत मंत्री महोदयांनी नवीं मुंबई पोलीस आयुक्त यांना उचित कार्यवाही करण्याबाबतचे पत्र दिले आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...