महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांवर !!
मुंबई : महाराष्ट्रात ८ हजार ३४८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १४४ मृत्यूंची नोंद ही गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार ३०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ९३७ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत १ लाख ६५ हजार ६६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आत्तापर्यंत ११ हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत १ लाख ६५ हजार ६६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५. ५ टक्के झाले आहे. आज राज्यात ८ हजार ३४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये १४४ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर ३.८५ टक्के झाला आहे. आजपर्यंत १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४५ हजार ५५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
आज राज्यात ८ हजार ३४८ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येने ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ९३७ इतकी झाली आहे. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

No comments:
Post a Comment