"कल्याणमध्ये वापरलेले पीपीई किट स्मशानात उघड्यावर ; धक्कादायक प्रकार"!
कल्याण - येथील बैलबाजार परिसरातील स्मशानभूमीत रुग्णवाहिका कर्मचारी वापरत असलेले पीपीई किट इतरत्र फेकून देत असल्याची घटना घडली आहे.
रुग्णवाहिका कर्मचारी त्यांचे पीपीई किट व हँड ग्लोज त्याच ठिकाणी काढून फेकून देतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
परिसरातील भटके कुत्रे हे किट उचलून इतरत्र नेत असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे
स्वच्छतेसाठी कर्मचारी नियमितपणे येत नसल्याने .
स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे पालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.



No comments:
Post a Comment