*"अआनिस च्या वतिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली...*
ओझर - शनिवार दि १८ जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मृतीदीनानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र (राज्य) या सामाजिक संघटनेच्या वतिने अभिवादन व आदरांजलीचा कार्यक्रम समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ओझर मिलिंद नगर या ठिकाणी नुकताच संपन्न झाला.
या वेळेस भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या गुरुशिष्यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करुन व द्विप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करणेत आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या ओझर शहर महीला आघाडी अध्यक्षा रेखा धनंजय जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शहर अध्यक्ष राजु नाना सोनवणे यांनी केले.
सदर कार्यक्रमास ओझरच्या मा.सरपंच व समितीच्या निफाड तालुका कार्याध्यक्षा आशाताई जाधव, तालुकाध्यक्षा श्रीमती शिलाताई जाधव आदींनी आदरांजली अर्पण करुन आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास ओझर शहर कार्याध्यक्ष प्रकाश गांगुर्डे, शारदाताई जाधव, शहर उपाध्यक्षा ताईबाई पवार, शहर सल्लागार बेबीताई आहीरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
महेंद्र तथा अण्णा पंडित.
प्रदेश-सरचिटणीस,
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती,
महाराष्ट्र राज्य.



No comments:
Post a Comment