Saturday, 18 July 2020

पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना कार्यकर्ते यांची प्रशासक म्हणून नेमणूक करा !

पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना कार्यकर्ते यांची प्रशासक म्हणून नेमणूक करा  ! 


"डॉ. संजय सोनवणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी"

    बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे अशा सर्व ग्रामपंचायतींवर त्या त्या ठिकाणचे स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते किंवा त्या ठिकाणच्या महिला संघटनेच्या महिला अध्यक्षा वा कार्यकर्ते  यांची त्या ठिकाणच्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक म्हणून नेमणूक करावी अशी मागणी लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यातील एक प्रतिथयश नामवंत उद्योजक डॉ. संजय राजाराम सोनावणे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे. 
       संपूर्ण राज्यात सद्या सर्वत्र मुदत संपलेल्या त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून आपापल्या परीने विविध क्षेत्रातील आपापल्या क्षेत्रातील आपल्या फेवरच्या लोकांची तथा व्यक्तींची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यासाठी वरच्या लेव्हलला आपापल्या परीने धावपळ करुन जोरदार प्रयत्न करत आहेत. या संदर्भात लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ. संजय सोनवणे यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर समाजातील त्या त्या ठिकाणचे स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळाचे अध्यक्ष वा कार्यकर्ते यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय श्री. उध्दव ठाकरे साहेब आणि त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय यांच्याकडे केली आहे. या प्रमाणे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. विलासराव कोळेकर साहेब यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर समाजातील त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पत्रकारांची प्रशासक म्हणून नेमणूक करावी अशी मागणी राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल यांना संपूर्ण राज्यातील पत्रकारांडून लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
      मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, सद्या संपूर्ण देश विदेशात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वत्र कोवीड १९ या संसर्गजन्य आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. शासनाच्या माध्यमातून कोवीड १९  च्या निर्मूलनाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात सर्वत्र लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 
    अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारे शासनाला राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रक्रिया राबवता येणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर समाजातील त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळाचे अध्यक्ष वा कार्यकर्ते यांची नेमणूक करावी. कारण समाजातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळाचे अध्यक्षा वा कार्यकर्ते ही मंडळी शक्यतो कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसते. त्यामुळे त्यांना आपल्या विभागासाठी प्रामाणिक पणे काम करण्याची संधी मिळेल आणि आपल्या ग्रामपंचायतींचा कारभार अत्यंत पारदर्शक पद्धतीने करतील यात शंका नाही.  आणि असे केल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब आणि संबंधित मंत्री महोदय यांनी या बाबतीत विचार करून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर समाजातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळाचे अध्यक्ष वा कार्यकर्ते यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...