Saturday, 18 July 2020

रायगड मध्ये लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंची ठराविक वेळेत विक्री सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी !

रायगड मध्ये लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंची ठराविक वेळेत विक्री सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी !


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) :
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाउनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने / आस्थापना सकाळी 6.00 ते 11.00 या वेळेत सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
        यापूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते दि. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजाविला हाेता. या काळात किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. घरपोच सेवा सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान पुरविण्यास परवानगी देण्यात आली हाेती.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...