तीन महिन्याचे एकत्रित वीज बिल होणार रद्द !
"भिवंडीतील ग्राहकांनी टोरेंट कंपनीचे बिल भरु नये!"
भिवंडी : अखेर सरकारला जाग आली आणि लाॅकडाऊनच्या काळातील ३ महिन्याचे एकत्रित घेतलेल्या रिडींगची विभागणी करुन प्रतिमास युनिटनुसार बिल दुरुस्त करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले असून याबाबत लवकरच परिपत्रक जाहिर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून भिवंडी तालुक्यातील ग्राहकांनी तूर्तास वीज बिल भरु नये.
टोरेंट कंपनीने महावितरणकडे बोट दाखवून लाॅकडाऊनच्या काळातील ३ महिन्याचे बिल अव्वाच्या सव्वा दिल्याने भिवंडी तालुक्यातील ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर "भिवंडी विकास मंचने" ग्राहकांनी वीज बिल भरु नये म्हणून वेळोवेळी आवाहन केले होते. त्याचबरोबर हजारो संख्येने ई-मेल मा. मुख्यमंत्री आणि मा. उर्जामंत्री यांना पाठविण्याचे आवाहनही केले होते. त्याला भिवंडीतील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. अखेर त्याची दखल उर्जामंत्र्यांना घ्यावी लागलीच. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातूनही वाढीव वीज बिलाला विरोध होऊ लागला होता.
टोरेंट कंपनी ग्राहकांना बिल बरोबर असल्याचे वरवर सांगत जरी असले तरी त्यात तांत्रिकदृष्ट्या बऱ्याच चुका होत्या. त्या चुका जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे, जिल्हापरिषद सदस्य कुंदन पाटील आणि भिवंडी विकास मंचचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे, विष्णू करंडे यांनी समोर आणल्या होत्या. याबाबत टोरेंट कंपनीला कैचित पकडण्यासाठी काही कागदपत्रांची जमवाजमव सुरु होती. शिवाय शासकिय पातळीवर निरंतर पत्रव्यवहार सुरु होता. आणि लवकरच मा.मुख्यमंत्री, मा.उर्जामंत्री, मा. पालकमंत्री यांच्या सोबत भिवंडी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही होणार होती.
"संपूर्ण महाराष्ट्रातूनच सरकारविरोधात आक्रोश निर्माण झाल्यामुळे उर्जामंत्र्यांनी काल वीज बिल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे."
तरीही भिवंडी तालुक्यातील ग्राहकांनी गाफील न राहता वीज बिलाबाबत आपल्या लेखी तक्रारी टोरेंट कंपनीला द्यायच्या आहेत.
आपल्याला टोरेंट कंपनी विरोधी लढाई सुरूच ठेवायची असून यापुढे टोरेंट ग्राहकांवर विजिलन्सच्या केस जास्त करण्याची शक्यता आहे.
ज्या ग्राहकांवर खोट्या विज चोरीच्या केस केल्यास त्यांनी तात्काळ भिवंडी विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा! तसेच वीज बिला बाबत समाधान होईपर्यंत आणि परिपत्रक जाहिर होईपर्यंत तूर्तास वीज बिल भरु नये.
*महेंद्र कुंभारे, संपादक तथा कामगार नेते, भिवंडी. मो.नं. 8888182324*

No comments:
Post a Comment