अखेर त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यांना अटक !!
मुरबाड ( मंगल डोंगरे )
कल्याण मुरबाड माळशेज घाट रस्त्यावर मोरोशी
गावाजवळ शनिवारी ता 18 जुलै रात्री साडेनऊ वाजन्याच्या सुमारास मोटार सायकल वरून एक तरुण व अल्प वयीन मुलगी जात असताना मोटार सायकल अडवून तरुणाला झाडाला बांधून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असताना त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली .
याघटनेतील आरोपी म्हणून टोकावडे पोलीसानी विनयभंग व पोस्को अंतर्गत खंडू मेंगाळ , नवसू भला , बंडू भला सर्व राहणार आवळीची वाडी व बाळू दत्तू वाघ राहणार मोरोशी या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली केले आहे .
No comments:
Post a Comment