नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!
ठाणे, दि. २९ जानेवारी २०२६ —
नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. मा. संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार व मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली परेड संचालन सराव, ध्वजवंदन सोहळा तसेच स्वयंसेवकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण (Capacity Building Course) यशस्वीरित्या पार पडले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. २६/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० ते १२.०० या वेळेत साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे परेड संचालन सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या सरावामध्ये एकूण ५० नागरी संरक्षण स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमास ठाणे व अंबरनाथ विभागातील क्षेत्ररक्षक तसेच मानसेवी अधिकारी उपस्थित होते. याच प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर व सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित यांना उत्कृष्ट कार्याबद्दल मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मानसेवी उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. बिमल नथवाणी, श्री. कमलेश श्रीवास्तव व श्री. करमबीर भुर्जी यांची उपस्थिती लाभली.
तसेच, उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे कार्यालयामार्फत सकाळी ०८.३५ वाजता नागरी संरक्षण उपनियंत्रण केंद्र, अंबरनाथ (प.), जि. ठाणे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा पार पडला. सेवा ज्येष्ठ सहायक उपनिरीक्षक श्रीमती दिपा घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यालयीन कर्मचारी, विभागीय क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी असे एकूण ८५ जण उपस्थित होते.
दरम्यान, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत दि. २०/०१/२०२६ ते २६/०१/२०२६ या कालावधीत अंबरनाथ प्रशिक्षण हॉल येथे Capacity Building of Civil Defence Volunteer Course No.11/2026 चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.०० ते सायंकाळी १७.४५ या वेळेत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गात एकूण ४१ स्वयंसेवक सहभागी झाले होते. दि. २६/०१/२०२६ रोजी सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित, मास्टर ट्रेनर डॉ. राहुल घाटवळ व डॉ. प्रकाश ठमके यांनी व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांनी संपूर्ण सात दिवसांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
या सर्व उपक्रमांमुळे नागरी संरक्षण दलाची कार्यक्षमता, शिस्त व आपत्ती व्यवस्थापनातील सज्जता अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले.
— DCCD, ठाणे
सौजन्य - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment