Thursday, 23 July 2020

आमदार भरतशेठ गोगावले" यांच्या लॉकडाऊन संदर्भातील मागणीला यश

"आमदार भरतशेठ गोगावले" यांच्या  लॉकडाऊन संदर्भातील मागणीला यश


       बोरघर / माणगांव  ( विश्वास गायकवाड ) जिल्हा अधिकारी निधी चौधरी यांनी सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत खलील प्रमाणे सर्व दुकाने खुली ठेवण्याचे दिले आदेश सर्व साधारण व्यापारी आणि जनतेचे होत असलेले हाल पाहून लॉक डाऊन शिथिल करण्या संदर्भात
पालकमंत्री, आणि जिल्हाधिकारी यांच्या कडे लॉकडाऊन संदर्भात "आमदार गोगावले यांनी चर्चा करून लॉक डाऊन उठवण्याची मागणी केली होती, गोगावले यांच्या मागणीचा विचार करून आज दि २३ रोजी जिल्हाधिकारी यांनी  सकाळी ६ ते दुपारी २ या वेळात दुकाने खुली करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच क्रीडांगण,व्यायाम, रनींग,ऑकिंग सायकलिंग इत्यादी सोशल  डिस्टनसिंगचे नियम पाळून मान्यता देण्यात आली आहे. 
       लॉक डाऊन शिथिल करण्यासाठी महाड तालुक्यातील आणि शहरातील सर्व व्यापाऱ्यानी आमदार गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी जाऊन विनंती केली होती.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...