Wednesday, 15 July 2020

ठाणे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच कल्याण तालुक्याचा झेंडा, खडवली गटाच्या सुषमा लोणे झेडपी अध्यक्ष!

ठाणे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच कल्याण तालुक्याचा झेंडा, खडवली गटाच्या सुषमा लोणे झेडपी अध्यक्ष!


कल्याण (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्या परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कल्याण तालुक्यातील खडवली जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या श्रीमती सुषमा लोणे यांची जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली असून हे पद कल्याण तालुक्याला पहिल्यांदा मिळाले आहे. त्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूका नुकत्याच जाहीर झालेल्या होत्या. ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती आहे ठाणे जिल्हय़ाच्या विभाजनानंतर सन २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वाधिक २५ जागा निवडून आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले. यावेळी अध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिला वर्गासाठी राखीव होते. त्यामुळे शहापूर व भिवंडी तालुक्याला हे पद देण्यात आले. तर उपाध्यक्षपद मुरबाड तालुक्याला मिळाले. त्यामुळे कल्याण व अंबरनाथ तालुका वंचित राहावे लागले होते.
सध्या ठाणे जिल्हा परिषदेत  ५३, सदस्य आहेत. यामध्ये शिवसेना ३४, भाजपा १६, राष्ट्रवादी २,काँग्रेस १,असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीत कल्याण किंवा अंबरनाथ तालुक्यातील एका संधी मिळणार असे जवळपास निश्चित झाले होते. कल्याण तालुक्यातील शिवसेनेच्या खडवली गटातून निवडून आलेल्या श्रीमती सुषमा सागर लोणे आणि वांगणी चरगाव गटातील पुष्पा गणेश पाटील या इच्छुक होत्या. मात्र पहिली संधी कोणाला कल्याण ला की अंबरनाथ तालुक्याला हे गुलदस्त्यात ठेवले होते. त्यामुळे आज झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत कल्याण तालुक्यातील खडवली गटाच्या सुषमा सागर लोणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी सुभाष पवार यांनाच कायम ठेवण्यात आले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांच्या निवडीने जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कल्याण तालुक्याला इतका मोठा व महत्त्वाचा मान शिवसेनेकडून मिळाला आहे. त्यामुळे कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न असो अथवा कोव्हीड केअर सेंटर, किंवा भविष्यात तालुक्यात अशा विषाणूजन्य आजाराविरोधात लढण्यासाठी एक सुसज्ज रुग्णालय जेथे ग्रामीण भागातील नागरिकांना औषध उपचार होतील. असे काहीतरी निर्माण व्हायला हवे.
झेडपीच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांच्या निवडीमुळे कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाकचौरे, उपसभापती रमेश बांगर, माजी सभापती दर्शना जाधव, रंजना देशमुख, भारती टेंभे, माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे यशवंत दळवी, सर्व सदस्यांनी तसेच कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला अतरगे मॅडम, बांधकाम विभागाचे उपअभियंता एस आर चव्हाण, आदी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. 

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...