दिपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटना, कल्याण-डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !
कल्याण प्रतिनिधी : पुरोगामी महाराष्ट्रात नवीं मुंबई येथील ऐतिहासिक बौद्ध कालीन लेणी तोडण्याचे षडयंत्र काही समाजकंटक करीत आहेत. या मुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून दिपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या कल्याण-डोंबिवली जिल्हयाकडून तिव्र शब्दात निषेध व्यक्त करुन आपल्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी कल्याणचे तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष योगेश गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष (RPI - A) सुमित माने, कडोमपा सचिव, RPI रमेश बर्वे, उपाध्यक्ष RPI अशोक लिहितकर, सरचिटणीस युवक RPI, मंगेश वाघमारे, कल्याण शहर अध्यक्ष, RPI, संजय जाधव, विभाग प्रमुख आकाश सावंत, जेष्ठ कार्यकर्ते DBN संजय सावंत, सल्लागार कडोमपा DBN व कार्यकर्ते उपस्थित होते. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले.
तहसीलदारांनी सर्व कार्यकर्त्यांना आश्र्वासित केले की आपले निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनापर्यंत पाठविण्यात येईल.
जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांनी तहसीलदार व उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.


No comments:
Post a Comment