Wednesday, 15 July 2020

उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील धारावी पॅटर्न राबविण्याचा निर्णय

उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील धारावी पॅटर्न राबविण्याचा निर्णय 



उल्हासनगर : - रामेश्वर गवई 
शहरात झपाट्याने वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मनपा प्रशासनाने मुंबईतील धारावी पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे , या संदर्भात मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे . उल्हासनगर मनपा क्षेत्रात अद्यापपर्यंत 4 हजारांच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या गेली आहे , शासकीय प्रसूतीगृह , कामगार हॉस्पिटल, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, यांसह अनेक वास्तूंचे कोव्हीड - 19 रुग्णालयात रूपांतर करण्यात आले असून खाजगी रुग्णालयाला देखील लाखो रुपयांचे अनुदान देऊन देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे , लोकांना वेळेवर उपचार मिळत नसून , अन्न देखील निकृष्ट दर्जाचे मिळत आहे , या संदर्भात अनेकांनी सोशल मीडियावर प्रशासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला आहे . काही दिवसांपूर्वीच पदभार घेतलेल्या मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन 13 जुलै, सोमवार रोजी मनपाच्या चारही प्रभागाचे सहाय्यक आयुक्त, कर्मचारी , महापौर लिलाबाई आशन , नगरसेवक यांच्याशी शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर आणि मृत्युदरावर नियंत्रण आणणे याबाबत चर्चा केली, प्रत्येक प्रभागातील नगरसेवक आणि प्रशासन यांच्या समनव्यातुन कोव्हीड - 19 मदतकार्यासाठी जवळपास 500 स्वयंसेवकांची नेमणूक करणे याबाबत सविस्तरपणे चर्चा झाली . यावेळी कोव्हीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर , येथील वैद्यकीय अधिकारी , डॉक्टर्स हे देखील उपस्थित होते , प्रत्येक प्रभागवार कोव्हीड - 19 नियंत्रण करणेबाबत कोणती कामगिरी पार पाडली याचा दहा दिवसांनंतर आढावा घेण्यात येईल . गंभीर व अतिगंभीर रुग्णांसाठी रेमेडीसिव्हर,टोमिलीझुमॅब या औषधांची खरेदी प्रक्रिया सुरू असून ऑक्सिजन पुरवठा , व्हेंटिलेटरची व्यवस्था, 4 हजार चाचणी किट लवकरात लवकर करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली . यावेळी कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी केले आहे , लोकप्रतिनिधिंचा जनसंपर्क दांडगा असतो, त्यामुळे त्यांचा प्रभागात असलेले संशयित रुग्ण, बाधित झालेले रुग्ण , त्यांच्या संपर्कात असलेले व्यक्ती यांची माहिती देण्यास त्यांनी मदत करावी असे त्यांनी सांगितले, नागरिकांना मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टनसिंग, प्रवासी वाहतूकचे नियम , दुकानदार व ग्राहकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन केल्यास धारावी पॅटर्न उल्हासनगर मध्ये यशस्वी होऊ शकतो अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...