लॉकडाऊन मुळे जनजीवन ब्रेकडाऊन - डॉ. आदेश घोणे यांनी उपस्थित केले जनतेचे प्रश्न
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) मा. ना. आदिताई तटकरे (राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा) यांना दोन्ही हातजोडून विनंती करत आहे. पुन्हा एकदा १० दिवसाचा तर्कहिन लाँकडाऊन करुन गोरगरीबांचा, मोलमजूरांचा आणि हातावर पोट असणाऱ्यांचा बळी घेवू नका.
तुम्ही कोरोनाच्या विषाणू ऐवजी आयुष्यातील घडी विसकटण्याचे काम करत आहात.
केंद्र सरकारने सांगिततल्या प्रमाणे जर शेती आणि मोठ मोठ्या कंपन्यांना चालू ठेवून हा लाँकडाऊन असेल तर हा लाँकडाऊन बिनकामाचाच आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. दहा दिवसानंतर जोर थांबला नाहीतर पुन्हा पुन्हा उपचार म्हणून लाँकडाऊनच करणार का ?
ग्रामीण भागातील जिल्हा बँक, सहकारी बँक, पतपेढ्या, टू व्हिलर व फोर विल्हर फायनान्स, सावकारी करणारे लोक, छोटे छोटे कर्ज देणारे फंडवाले हे आता कर्जदारांच्या मागे हप्ता भरण्यासाठी तगादा लावत आहेत.
यामुळे सर्व सामान्य मध्यवर्गीय व गोरगरिब काकूळतीला आला आहे. कुणाच्या नोकऱ्या गेल्यात कुणाचे रोजच्या रोजगाराचे उत्पन्न गेले, तर काहींना आता कोणत्याही प्रकारची कामच शिल्लक राहीलेली नाहीत. मग अश्या या भयानक परिस्थिती आपण घेतलेला निर्णय निश्चितच योग्य नाही. हे सांगने आमचे कर्तव्य आणि कर्मप्राप्त आहे. तुमच्या संविधानिक पदाचा मानराखतच हे मत मांडत आहे. कारण भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत आमचे प्रतिनिधी जर काही गोष्टी समजून न घेता केवळ काही मोजक्याच लोकमतांचा विचार करत संपूर्ण जनतेला वेठीस धरत असल्यास जनता आवाज उठवल्याशिवाय राहाणार नाही.
मा. ना. पालकमंत्री रायगड यांना काही मुद्दे विचारायचे आहेत. याची उत्तर देणे हे कर्तव्य व कर्मप्राप्त आहे.
०१) रायगड जिल्ह्यात जवळजवळ १६ मार्च २०२० पासून ते जनता कर्फ्यु २२ मार्च २०२० मग एकदिवसाचा दिलासा पुढे २४ मार्च च्या मध्यरात्री पासून २१ दिवसाचा लाँकडाऊन मग परत १४ दिवसाचा लाँकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय जवळजवळ ३ जून २०२० पर्यंत पाळण्यात आला. पण निसर्गाच्या प्रकोपामुळे नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले आणि हा लाँकडाऊन संपवावा लागला.
०२) मग २२ मार्च २०२० पासून किंवा पुर्वी माणगांव तालुक्यात असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड का पुर्ववत करण्यात आलेले नाहीत ?
०३) जेव्हा हि साकळी पूर्ण थांबण्यासाठी केंद्र सरकारने व राज्यसरकारने जो जवळजवळ ३ महिने लाँकडाऊन घेतलेला होता. या वेळेत रायगड जिल्हातील १५ तालुक्यामध्ये आपण कोरोना टेस्टींग लँब का उभ्या करुन घेतल्या नाहीत ?
०४) जे काम तुम्ही ३ महिने कालावधीत केलेले नाही. ते तुम्ही या १० दिवसाच्या किरकोळ १० दिवसाच्या लाँकडाऊन साठी करणारं का ? ही शंका आता येत आहे.
०५) मध्यमवर्गीय, गोरगरीब, शेतमजूर व रोजंदार करणारा व्यक्ती केवळ रेशनच्या २० किलो तांदूळ, ५ किलो गहू, न मिळालेले अदृश्य राँकेल त्याचे कुटूंब चालवेल का ?
०६) दहा दिवस लाँकडाऊन ऐवजी पुढचा संपूर्ण महिना लाँकडाऊन करा. पण हे लिखित द्या. तुम्ही लाँकडाऊन पाळल्याने संपूर्ण कोरोना रायगड जिल्ह्यातून हद्दपार होईल.
०७) तुमच्या मते जर कोरोनाचा इलाज घरी राहुन व योग्य काळजी घेवून होणे शक्य आहे. तर मग हा लाँकडाऊन करण्याचा खटाटोप कोणासाठी व का ?
०९) निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या लोकांना अजूनही मदत नाही. गावागावात लाईट पोहचल्या नाहीत. तसेच कोकणात घरावरील स्लँपच्या पावसाच्या सरक्षंणासाठी उभारण्यात आलेल्या स्टिल किंवा समिंटे पत्र्याच्या शेड चे नुकसान झाले असेल तर त्याला आर्थिक मदत केवळ माणगांव तालुक्यापुरती दिली नाही. हा दुजाभाव का ? त्यावर हि लक्ष देवून हे काम गेली ३० दिवसापून का रखडलेली आहेत. त्यावर प्रकाश टाका
१०) पालकमंत्र्यांना विनंती आहे. आता लाँकडाऊन पेक्षा आर्थिक मदतीची आणि सामाजिक स्तरावर आधार देणाऱ्या यंत्रनेची गरज आहे. ते करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे आग्रह धरुन सर्व सामान्य रायगड जिल्हातील जनतेला प्रोत्साहन द्या.
११) अमेरिका, जपान इ. प्रगत राष्ट्रांनीसुध्दा संपूर्ण लाँकडाऊन केलेले नाही. मात्र आमच्या इथे आजारापेक्षा उपचारच भयानक हि परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे योग्य नाही. आमचा या संपूर्ण लाँकडाऊनला तत्वः सामाजिक अनुशंघाने विरोधच आहे.
आमच्या मते बाजारपेठ जास्तवेळ उघडी ठेवा कारण तरच बाजारात गर्दी होणार नाही. कोरोना हा विषाणू जर बाजारपेठ बंद ठेवून बरा होणार असता. तर मागच्या ३ महीन्यात संपूर्ण जग बंद होते. तो संपूर्ण जगातून गायब झाला असता. पण तस काहीच झालेले नाही.
आमच्या इंदापूर व्यावसायिक संघटनेला कोणत्याही प्रकारे १० दिवसाचा लाँकडाऊन मान्य नाही. त्यामुळे केवळ काही व्यापारी नसलेले धनदांडगे, नवनिर्मित गावपुढारी, स्वयंघोषित राजकारणी व स्वयंघोषित सामाजिक नसलले कार्यकर्ते यांच्या समाधानासाठी हा संपूर्ण रायगड जिल्हा लाँकडाऊन आहे का ?
या धनदांडग्या स्वयंघोषित उध्दारकर्तांना आमची विनंती आहे. आमच्या इंदापूर व्यावसायिक संघटनेतील तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांचे मुळ उत्पन्न हे बाजारपेठेवर अवलंबून आहे. तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते सुरु आहेत. वैयक्तिक इतरही गोष्टींसाठी संपूर्ण आर्थिक गोष्टींची निकड आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण १० दिवसाचा लाँकडाऊन असल्यास आमच्या व्यावसायिक वर्गाला त्यांच्या रोजच्या उत्पना इतकी सरासरी आर्थिक मदतीची तरतूद मा. पालकमंत्री (रायगड जिल्हा) यांनी करुन पुढे किती दिवस करायचा आहे हे सांगून या संकटातून मुक्त होण्यासाठी मार्ग तयार करा. अन्यथा फक्त लाँकडाऊनचे कारण देत सामाजिक जनजीवन विस्कळीत करु नका. सामान्य गोर गरीब, हातावरचे पोट असणारे व्यावसायिक, मजूर, शेत मजूर, रोजंदार हे सगळे बाजारपेठ बंद असल्यामुळे एका वेळाच्या जेवणाला सुध्दा महाग झालेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा पुन्हा लाँकडाऊन करुन काय हातीलागणार हे गाव पुढाऱ्यांना, स्वयंघोषित नेत्यांना, स्वयंघोषित सामाजिक नेत्यांना, या लोकांचा विचार करणे गरजेचे आहे.
सर्व सामान्य जनतेची आत्ताची परिस्थिती -
१) बाजारपेठेतील धनाढ्य व्यापारी लाँकडाऊन या नावाचा फायदा घेत घरातूनच दुकाने उघडी ठेवून सर्व सामान्यांना चढ्या भावाने म्हणजे मुळ किमतीच्या जवळजवळ तिप्पट भावाने वस्तू विकतात.
२) कोणतेही डॉक्टर कोरोनाच्या भितीपोटी सर्वसामान्य जनतेला शेतीत काम करुन, तसेच इतर व्हायरल फिवर आल्यावर सुद्धा कोरोनाचे नाव सांगत जबाबदारी झटकून शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी सांगतात. मात्र धनाढ्य पेशंटला लगेचच तपासातात. म्हणजे हा आजार केवळ गोरगरिबच वाढवत आहेत. असा शिकलेल्या वर्गाचा समज झालेला आहे.
उदा. मा. अमिताभ बच्चन यांना तर हा आजार घरात बसूनच झाला आहे. म्हणजे लाँकडाऊन मुळे आजार होत नाही. हे पुन्हा खोटं ठरले.
३) आर्थिक कोंडी पराकोटीची झालेली आहे. ती आपल्या समजण्यापलिकडे पोहचली आहे.
हे समजून घेत पहिले आम्हाला सर्व गोष्टी पुरवाव्या मगच "१० लाँकडाऊन" सुरु करावा. हि सर्व सामान्य जनतेच्या वतिने विनंती वजा सुचना आहे.
आपला नम्र
डॉ. आदेश यशवंत घोणे (इंदापूर व्यापारी संघटना )
मोबाईल - 9421160100, 9970142687

No comments:
Post a Comment