Monday 27 July 2020

ऑनलाईन शिक्षणाविषयी शिक्षण विभागा कडून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी !!

ऑनलाईन शिक्षणाविषयी शिक्षण विभागा कडून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी !!

      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  राज्यात कोविड- १९ च्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने दि. १५ जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ जून रोजी च्या जारी केलेल्या शासन निर्णयानुसार प्रदान केले होते. 
       या शासन निर्णयात इयत्ता पहिली ते बारावी चे वर्ग सुरू करण्याबाबतच्या अंदाजे तारखा देण्यात आल्या होत्या तसेच त्यामध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. आता दिनांक २२ जुलै च्या या शासन निर्णयानुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याविषयीचे निर्देश शासनाने दिले आहेत. ते निर्देश पुढीलप्रमाणे:- 
इयत्ता- पूर्व प्राथमिक, सोमवार ते शुक्रवार, ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी- प्रत्येक दिवशी ३० मिनिटांपर्यंत, शिक्षणाचे स्वरूप- पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन. इयत्ता पहिली ते दुसरी, सोमवार ते शुक्रवार, ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी- प्रत्येक दिवशी ३० मिनिटांची दोन सत्रे, शिक्षणाचे स्वरूप- त्यापैकी १५ मिनिटे पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन आणि १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण, इयत्ता तिसरी ते आठवी,  प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे, शिक्षणाचे स्वरुप-विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, इयत्ता नववी ते बारावी, प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची चार सत्रे, शिक्षणाचे स्वरुप-विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण असे आहे.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...