Wednesday, 1 July 2020

हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त माणगाव मध्ये कृषी दिन साजरा !!

हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त माणगाव मध्ये कृषी दिन साजरा !!


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बाबत त्यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक १ जुलै रोजी माणगाव तालुक्यातील रेपोली, निळगुज , लोणारे गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यामार्फत मार्गदर्शन करून कृषी दिन साजरा करण्यात आला.
        राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व तो समृद्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव तालुका यांच्यामार्फत कृषी दिनांक १ जुलै ते ७ जुलै २०२० या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. 
     या कार्यक्रमाचा शुभारंभ करतेवेळी उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव श्री मिलिंद जाधव , तालुका कृषी अधिकारी श्री पोपट नवले, मंडळ कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी उपस्थित होते. या वेळी  उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव शेतकऱ्यांना काकडी लागवड तंत्रज्ञान व  भात लागवडीबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना कलमी रोपे वाटप करण्यात आली.
       सदरील सप्ताहात खरीप हंगाम २०२० यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपविभागातील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
     यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजना फळबाग लागवड, हवामान आधारित फळपीक विमा योजना, भात पिकाच्या लागवडीचा विविध पद्धती त्यावरील कीड रोग व्यवस्थापन व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी मनुष्यबळात कमी खर्चात  पिकाचे उत्पादन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...