Tuesday, 4 August 2020

कल्याण तहसील कार्यालयाला गैरसोयीचा विळखा, संपूर्ण परिसराचा पुर्नविकास होण्याची गरज !!

कल्याण तहसील कार्यालयाला गैरसोयीचा विळखा, संपूर्ण परिसराचा पुर्नविकास होण्याची गरज !! 


कल्याण (संजय कांबळे) ऐतिहासिक अशा कल्याण नगरिचे तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या तहसील कार्यालयाची भलतीच वाताहात झाली असून या कार्यालयाला अनेक गैरसोयीचा विळखा पडला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराचा पुर्नविकास होण्याची आवश्यकता आहे.
कल्याण तालुक्यात कल्याण जंक्शन च्या अगदी जवळ कल्याण तहसील कार्यालय आहे. हे कार्यालय ब्रिटिश कालीन असून अंत्यत वर्दळीच्या ठिकाणी असल्याने येथे सदैव मोठ्या प्रमाणात नागरिकाची गर्दी होत असते. शिवाय तहसीलदार हे तालुका मॅजेस्टर असल्याने ८४ क च्या केसेस, पी एम किसान योजनेची माहिती, - ५४/५५ चे उतारे, फेरफार, रेशनिंग धान्य योजना, पीकपाणी अर्ज, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती, आदी 
या कामासाठी व सुनावणी करिता वादी प्रतिवादी, वकील, शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित  राहतात. तसेच कोणत्याही प्रकारचे आंदोलन, उपोषण, धरणे निदर्शन, किंवा कोणत्याही घटनेचा निषेध व्यक्त करायचा असेल तर तहसील कार्यालयात जावे लागते. याचे कारण म्हणजे तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना किंवा राज्यातील मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचे असेल तर ते तहसीलदार यांच्या कडे दिले जाते 
कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या आजुबाजुला इतर कार्यालयांचा गराडा पडलेला आहे. सेतू सुविधा कार्यालय 
एम एफ सी पोलीस ठाणे, कंट्रोल आॅफिस, कैदी ठेवण्याच्या खोल्या, सीटी सर्वे कार्यालय, नागरी संरक्षण विभाग, सी आय डी आॅफिस, एन ऐ तहसीलदार कार्यालय, गुन्हे शाखेचे कार्यालय आदी आॅफिसचा समावेश आहे. त्यामुळे हे ठिकाण खुराड्या प्रमाणे झाले आहे. हे कमी की काय म्हणून तहसील कार्यालयासमोर तथाकथित स्टॅम्प वेडंरानी केलेले अतिक्रमणे यामुळे येथे सर्वाचींच पंचायत होत आहे.
कल्याण तहसील कार्यालया अंतर्गत सुमारे ३५ तलाठी, ६ मंडल अधिकारी, असून दोन महिला तलाठी आहेत. तर कार्यालयात अनेक विभागात महिला कर्मचारी आहेत. तरीही येथे नागरिक सोईसुविधाची पुरती वाणवा आहे. शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, पार्किंग आदीची मोठी गैरसोय आहे. त्यामुळे हे तहसील कार्यालय आहे की असुविधाचे आॅफिस हे कळत नाही.
कल्याण वकील बार असोसिएशनचे सदस्य जितेंद्र जोशी यांनी कल्याण तहसील कार्यालय परिसरात शौचालय व मुतारी या सुविधांची जिल्हाधिकारी यांच्या आकस्मित निधीतून पुर्तता करण्याची मागणी केली होती. पण त्याचे काहीच झाले नाही. तर या संपूर्ण परिसराचा पुर्नविकास होण्याची अंत्यत आवश्यकता असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. या बाबतीत कल्याण चे तहसीलदार दीपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले" हे खरे आहे की येथे नागरिकांची गैरसोय होत आहे. पण मी येथे प्राथमिक सुविधा  निर्माण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे."

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...