स्वतंत्र दिनानिमित्त संजीवनी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्ट चा सामाजिक उपक्रम!
कल्याण (संजय कांबळे) : १५ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त डोंबिवली मध्ये संजीवनी हेल्थ केअर चॅरीटेबल ट्रस्ट माध्यमातून स्वच्छ भारत अभियान व जंतुनाशक फवारणी मोहीम तसेच कोरोना योद्धा सन्मानपत्र देवून 25 कोव्हिड योद्धांचा गौरव नुकताच करण्यात आला.
कोरोना महामारी च्या काळातही संजीवनी हेल्थ केअर चॅरीटेबल ट्रस्ट च्या सेक्रेटरी मनीषा गांगुर्डे व सहकाऱ्यांच्या माध्यमातून डोंबिवली मध्ये स्वच्छ भारत अभियान तसेच जंतुनाशक फवारणी शास्त्री नगर आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन व डोंबिवली रेल्वे स्टेशन, तिकीट काउंटर, रेल्वे पोलिस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन पूर्व येथे स्वच्छ भारत अभियान व जंतुनाशक फवारणी, जंतुनाशक पावडर रस्ते व संबंधित ठिकाणी करण्यात आली व रस्त्यातील प्लास्टिक व कचरा मुक्त करून संजीवनी हेल्थ केअर च्या पुढाकाराने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात संस्थेच्या सेक्रेटरी मनीषा गांगुर्डे यांनी 30 ते 40 महिला,पुरुष यांना रोजगार मिळवून देवून त्यांच्या सोबत स्वतः ही कार्य करत आहेत सदर स्वयंसेवक नागरिकांच्या घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सीमीटर च्या साहाय्याने तपासणी करून महानगर पालिकेच्या शून्य कोव्हिड मोहीम उपक्रमात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मागील एक महिन्या पासून मोठे योगदान देत आहेत तसेच आज संस्थेच्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमात सहभागी झाल्या बद्दल संस्थेच्या सेक्रेटरी मनीषा गांगुर्डे यांनी संस्थे मार्फत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोव्हिड योद्धा सन्मानपत्र देवून सर्व स्वयंसेवकांना सन्मानित करून गौरवण्यात आले आहे. सदर उपक्रमात आरोग्य विभागाचे डॉक्टर स्मिता म्याडंम तसेच तेथील आरोग्य कर्मचारी यांना सलामी देवून कृतज्ञता व्यक्त केली.आरोग्य केंद्र,पोलीस स्टेशन, डोंबिवली स्टेशन येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संजीवनी हेल्थ केअर च्या मनीषा गांगुर्डे व सर्व स्वयंसेवकांना उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment