ठाणे जि.प.चा राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा शुभारंभ !!
मुरबाड {मंगल डोंगरे } पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद ठाणे यांचे वतीने राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम फेज-२चा शुभारंभ आज कल्याण तालुक्यातील पशुवैदयकीय दवाखाना खडवली येथे करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमाताई लोणे यांचे हस्ते गोमाता पूजन करण्यात आले.तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांचे हस्ते परीसरात वृक्षारोपण सुद्धा केले.यावेळी माजावर आलेल्या देशी गायीला सिद्ध वळूपासून तयार करण्यात आलेले विर्य कृत्रिम रेतन पद्धतीने गायीचे गर्भाशयात सोडण्यात आले.ही मोहीम १ऑगस्टपासून ते ३१मे २०२१ पर्यंत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खेडेपाडयात वाडी वस्तीत जाऊन पशुवैदयकीय अधिकारी वाझंतपासणी शिबीरे घेऊन पैदासक्षम गायी म्हशीना औषधोपचार करुन माजावर आनतील तसेच ज्या गायी म्हैशी नैसर्गिक रित्या माज दाखवतील अशा सर्व गायी म्हैशीना कानाला इनाफ टॅग लाऊन नोंदणी केली जाईल व अशा जनावरांना कृत्रिम रेतन केले जाणार आहे. यामध्ये मुरा,जाफराबादी,सुरती जातीचे तसेच गायीमध्ये जर्सी,हाॅल्स्टीन फ्रीजीयन,खिलार,डांगी गीर,साहीवाल इत्यादी उच्च वंशावळीचे कृत्रिम रेतन केले जाणार आहे. याच मोहीमेचा पहिला शुभारंभ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ लक्ष्मण पवार यांनी एका गायीची गर्भाशयात हाताळणी करुन पदाधिकारी यांचे समोर कृत्रिम रेतन केले व या योजनेचा संवाद साधला.या प्रसंगी पशुसंवर्धन व कृषी सभापती संजय निमसे व कल्याण तालुक्यातील सभापती उपसभापती तसेच डाॅ. गोरखनाथ चांदोरे, डाॅ.सुजाता देवरे,डाॅ. मादळे व डाॅ. जयश्री दळवी इत्यादी अधिकारी उपस्थित होते

No comments:
Post a Comment