ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांची औरंगाबाद मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली, गुंणवत अधिका-याच्या बदलीने झेडपी मध्ये "कही कुशी कही गम"?
कल्याण (संजय कांबळे) : प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत असताना संवग लोकप्रियता सर्वांच्याच वाट्याला येते असे नाही. परंतु याला ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब भि नेमाणे हे अपवाद ठरले.सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक खूप चांगले काम करता येते हे आपल्या कृतीतून दाखणा-या एका गुंणवत
वरीष्ठ अधिका-याची बदली औरंगाबाद महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली असून एक नवीन क्षेत्र काम करण्यासाठी मिळणार यांचा आनंद असलातरी शांत, संयमी, अंत्यत हुशार, कामाप्रति प्रखर निष्ठा असलेला अधिकारी आपल्या ला सोडून जाणार यांचे कुठेतरी दुःख देखील होत आहे. त्यामुळे सध्या ठाणे जिल्हा परिषदेत बप्पासाहेब नेमाणे यांच्या बदलीने "कही कुशी कही गम" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्हा हा अधिकार व कर्मचारी यांच्या साठी चॅलेंजिंग जिल्हा म्हणून ओळखला जातो पुणे .नंतर सर्वाधिक लोकप्रतिनिधी या जिल्ह्य़ात आहेत. अशा या ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ब भि नेमाणे यांची नियुक्ती झाली.
तत्पूर्वी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बप्पासाहेब भिमराव नेमाणे यांनी सन 1992 मध्ये महाराष्ट्र विकास सेवा परीक्षा उत्तीर्ण करून जालना झेडपीचे वर्ग 1चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदी सेवेत रुजू झाले. यांनतर अंबड गटविकास अधिकारी म्हणून साडेतीन वर्षे काम केले. यांनतर पुन्हा लातूर जिल्हा परिषदेत उपमुख्यकार्यकारी ग्रामपंचायत म्हणून सेवा केली. उस्मानाबाद, लातूर, धुळे झेडपीत कधी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण, प्रकल्प संचालक अशा विविध पदांवर काम करुन आपल्या कामाचा ठसा उमटविला.
यांनतर सन 2015 मध्ये विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आस्थापना उपायुक्त पदावर काम केले. येथून बुलढाणा जिल्ह्य़ात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि येथून थेट ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाले. त्यापूर्वी सोलापूर जिल्हात काम करित असताना पाणलोटक्षेत्रात महाराष्ट्रात सर्वात प्रथम जलसंधारणाची कामे पूर्ण केल्याबद्दल शासनाचा गुंणवत अधिकारी म्हणून ग्रामविकास मंत्रीच्या हस्ते नेमाणे यांचा सत्कार करण्यात आला होता.
ठाणे जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वाधिक काळ हा पुर परिस्थित मदत करण्यात गेला. तर यानंतर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे तीन ते चार महिने कोरोनोच्या उपाययोजना करण्यात गेले. तरीही पाणी पुरवठा, बांधकाम, बालविकास, समाजकल्याण, आदी विकास कामांसाठी सुमारे 90 टक्के पेक्षा जास्त निधी खर्च केला. गेल्या कित्येक वर्षांपासून झेडपीच्या इमारतीचा प्रश्न तसाच रखडला होता. ती पाडण्याचे काम तरी नेमाणे यांच्या कार्यकाळात झाले.
अंत्यत शिस्तप्रिय, स्विकारलेल्या कामात स्वतः ला झोकून देऊन काम करण्याची उर्मी, प्रसंगी कठोर पण काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी समर्थपणे उभे राहणारे ब भि नेमाणे हे गेल्या 17 महिन्यात सर्वाचे आवडते अधिकारी ठरले. त्यांनी अजून काही वर्षे ठाणे जिल्हा परिषदेत सेवा करायला हवी होती असे बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटते. पण त्यांनी केवळ औरंगाबाद येथे जाण्याची इच्छा.व्यक्त केली. आणि ताबडतोब त्यांना औरंगाबाद महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त नियुक्ती केली. हे फक्त गुंणवत अधिका-याच्या बाबतीतच घडू शकते. आजच्या बदल्यांच्या घोडेबाजारात असे उदाहरण क्वचित प्रसंगी पाह्यला मिळते. त्यांना याबाबत विचारले असता "जिल्हा परिषदेच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक कामे केली तर विकास सहज होऊ शकतो"
गेली 28 वर्षे ब भि नेमाणे यांनी विविध वरिष्ठ पदावर काम केले. अनेक वेळा त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी समर्थ पणे सांभाळली, जिल्हा परिषदेत इतके वर्ष काम केल्यानंतर ते प्रथमच महानगर पालिका या नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुजू होत आहेत. तेथे देखील ते आपल्या कामाचा ठसा उमटवून उरलेली सव्वाचार वर्षे लोकाभिमुख कामे करतील. अशा शुभेच्छा साहेबांना!

No comments:
Post a Comment