Friday, 7 August 2020

बदली प्रक्रियातील पदे भरताना तालुक्यातील पदांचे सामानिकरण ठेवा -'उपाध्यक्ष सुभाष पवार'

बदली प्रक्रियातील पदे भरताना तालुक्यातील पदांचे सामानिकरण ठेवा -'उपाध्यक्ष सुभाष पवार'



मुरबाड (मंगल डोंगरे )
   कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर 2020- 21 या आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात शासन निर्णयान्वये सूचना दिलेल्या आहेत. ग्रामविकास विभागाने दिलेल्या सूचना दिल्या असून जिल्हा परिषदेच्या वर्ग क आणि वर्ग ड या कर्मचाऱ्यांच्या बदल्या 15 मे 2014 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार करण्याच्या सूचना दिलेले असल्याने सर्वच तालुक्यातील भरती केलेल्या पदांचा समतोल राखावा अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांनी मुख्य कार्यकारीअधिकारी यांना दिले आहे.
       ठाणे जिल्हा परिषद मधील कल्याण,अंबरनाथ हे तालुके पेसा मध्ये येत नाहीत.तर मुरबाड आणि भिवंडी हे तालुके निम पेसा मध्ये येतात पेसा मध्ये असलेल्या तालुक्यातील सर्वच पदे जवळपास भरली जातात.परंतु काही तालुक्यात बरीच कर्मचारी पदे रिक्त असल्याने या पदांचे समाणीकरण व्हावे त्याचप्रमाणे ग्रामविकास विभाग यांच्याकडून 2014 च्या शासन निर्णयातील बदल्यांच्या सरासरी धोरणामध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या तालुक्यात नेहमीच पदांची रिक्तता जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा जास्त असते अशा तालुक्यातील रिक्त पदे प्रशासकीय आणि विनंतीने भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट क आणि गट ड मधील विविध प्रशासकीय बदली व विनंती बदली  या धोरणानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागातील आणि नेहमीच जास्त जागा रिक्त असलेल्या तालुक्यातील रिक्त पदे सरासरी टक्केवारी नुसार प्राधान्य देऊन जिल्ह्याच्या आणि तालुक्यातील पदांचे समाणिकरण समतोल करावे आणि तशा सूचना सर्व खातेप्रमुखांना द्याव्यात असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...