Friday, 30 January 2026

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

ठाणे (एस. एल. गुडेकर) :

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उपक्रम म्हणून भिवंडी आगरी महोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे. साई सेवक प्रतिष्ठान व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ ते बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६ या कालावधीत १५व्या भिवंडी आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव ग्रुप ग्रामपंचायत क्रीडांगण, आदित्य कंपनीजवळ, मुंबई–नाशिक महामार्ग, सोनाळे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

भिवंडी आगरी महोत्सव २०२६ चे अध्यक्षपद ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. पंडित नकुल पाटील यांनी भूषविले. मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन या त्रिसूत्रीचा अंगीकार करून समाजविकासासाठी कार्यरत असलेल्या साई सेवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवात दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष श्री. विशुभाऊ म्हात्रे, स्वागताध्यक्ष डॉ. श्री. यशवंत महादू सोरे, कार्याध्यक्ष श्री. हनुमान पाटील, उपाध्यक्ष श्री. संतोष पाटील, सल्लागार डॉ. श्री. भगवान हेंदर ठाकूर, श्री. अमर म्हात्रे, श्री. रमेश कराळे, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. श्री. शशिकांत गोतरणे तसेच सर्व उपाध्यक्ष व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महोत्सवाने सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आगरी समाजाच्या योगदानाला नवी दिशा दिल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...