जागतिक आदिवासी दिन : 'गाव पातळीवर साजरा करणार' आदिवासी बांधवांचे वाड्या पाड्यात अवाहन.
मुरबाड (मंगल डोंगरे) :
उद्या 9 आँगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी बांधव हे तालुका स्तरावर साजरा करतात.परंतु सध्या जगभरात कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असल्याने आदिवासी बांधवांचे आंनदावर व उत्साहावर मोठी संक्रांत आल्याने या महामारीतुन आपला बचाव करण्यासाठी या वर्षी जागतिक आदिवासी दिन हा तालुका स्तरांवर साजरा न करता तो गाव पातळीवर साजरा करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक आदिवासी समाज संघटनानी काढले असुन त्याचा प्रसार करण्यासाठी ठाणे जिल्ह्या परिषदेच्या समाज कल्याण सभापती नंदाताई उघडा.तसेच मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती आरुणा खाकर ,जिल्हा परिषद सदस्य किसन गिऱ्हा,नागेश बांगारा,तालुका अध्यक्ष अनिल कवटे, सचिव मोहन हिंदोळा,रघुनाथ खाकर,यांच्या सह अनेकसमाज बांधव वाड्या पाड्यावर बैठका घेऊन आवाहन करत आहेत.
संपूर्ण जगभरात 9 आँगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन म्हणजे तमाम आदिवासी बांधवासाठी एक पर्वणीच असते त्या दिवशी आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक तसेच हुतात्मे यांच्या समाधी स्थळावर मानवंदना दिली जाते. शिवाय आदिवासी यांचे अंगी असणाऱ्या कला ,पारपांरिक नृत्ते आयोजित कार्यकमात सादर केल्या जातात .तसेच आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव करण्यात येतो व अधिकारी वर्गास भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते असे विविध कार्यक्रम हे सालाबादप्रमाणे तालुका स्तरावर आयोजित केले जातात.
दरम्यान गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले असल्याने त्यामध्ये अनेक नागरिकांंचे बळी जात आहेत. आदिवासी बांधवांनी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम तालुका स्तरावर आयोजित केल्यास त्या सोहळ्यात लाखो आदिवासी बांधव सहभागी होतात. व त्यामुळे कोरोना विषाणुचे संक्रमण वाढुन आदिवासी बांधवांचे जीवनमान धोक्यात येईल .हे टाळण्यासाठी या वर्षी 9 आँगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन हा गाव पातळीवर साजरा करण्यासाठी शासनाने लागु केलेल्या सोशल डिस्टसिंग चे नियम पाळुन व तसेच सर्वत्र स्वच्छता ठेऊन ठिकठिकाणी शोभायात्रा,वृक्ष रोपण नाचगाणे आदिवासी क्रांतिकारक प्रतिमा पुजन,विद्यार्थी सत्कार, समारंभ, तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीचा गौरव इत्यादी कार्यक्रम आयोजित करुन आपला आनंद व उत्साह द्विगुणित करुन कोरोना या महामारी पासुन समाजाला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करुन आदिवासी संस्कृती चे दर्शन जगाला दाखवायचे आहे. असे अवाहन सह्याद्री आदिवासी म.ठाकुर -ठाकर समाज उन्नती मंडळाचे वतीने करण्यात येत आहे.
*** शासनाचे आदिवासी विभागा मार्फत प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेत हा जागतिक आदिवासी दिन साजरा करुन विद्यार्थ्यांचे अंगी असणाऱ्या कला सादर करणे साठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होत असे.व त्याठिकाणी मान्यवरांचे हस्ते विविध कला सादर करणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येत असे परंतु यावर्षी कोरोना या महामारीने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण केले असल्याने त्याचा संसर्ग होऊ नये म्हणुन शाळा काँलेज बंद असल्याने आदिवासी बांधवाचा गुणवंत विद्यार्थी या पुरस्कारा पासुन वंचित राहिला असल्याने विद्यार्थी व वर्गात नाराजी पसरली आहे.****

No comments:
Post a Comment