Friday, 7 August 2020

पुण्याची सिरम इन्स्टिट्युट माफक दरात उपलब्ध करून देणार कोरोना वरची लस !!

पुण्याची सिरम इन्स्टिट्युट माफक दरात उपलब्ध करून देणार कोरोना वरची लस !!


पुणे : करोना संकटातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे त्यावरची लस. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचललं आहे.

सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...