Friday, 7 August 2020

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशाच्या सेवेसाठी श्रीवर्धन आगार सज्ज : 'आगार व्यवस्थापक एम. बी. जुनेदी'

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशाच्या सेवेसाठी श्रीवर्धन आगार सज्ज : 'आगार व्यवस्थापक एम. बी. जुनेदी'


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड): कोकणातील चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी त्यांना कोकणातील आपापल्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीवर्धन आगाराचे जादा बस सोडण्यात येणार आहेत. अशी माहीती श्रीवर्धन आगाराचे 'आगार व्यवस्थापक श्री. एम. बी. जुनेदी' यांनी दिलीआहे.  
     प्रवाश्यांच्या सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जुनेदी यांनी केले आहे.
     संगणकीय आरक्षण सुविधा ८ऑगस्ट ते १२ आगस्ट  या कालावधी पर्यंत असणार आहे.
या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन श्रीवर्धन आगाराने दिनांक ८ आगस्ट ते ११ आगस्ट पर्यंत दररोज जादा ७ बसेस सोडणार आहेत  तसेच आणखी प्रवाशांची मागणी वाढळयास अतिरिक्त ५ बसेस सोडणार असल्याचे जुनेदी यांनी सांगितले आहे .
तसेच दिनांक ९ आगस्ट ते १२ आगस्ट या कालावधी मध्ये पनवेल श्रीवर्धन ३ बसेस जादा सोडणार आहेत .तसेच   श्रीवर्धन आगारातून ४  नवीन टायमिंग गणेशोत्सवा प्रवाशांच्या सेवेसाठी  सुरू करणेत आले आहेत. श्रीवर्धन नालासोपारा बोर्ली मार्गे सुटण्याची वेळ ९:१५ व दुपारी १३:००वाजता ,नालासोपारा बोर्ली श्रीवर्धन ५:४५ वाजता आणि रात्री नालासोपारा बार्ली मार्गे श्रीवर्धन २१:३०वाजता सुटणार आहेत, श्रीवर्धन बोर्ली भांडुप सकाळी ५:०० वाजता, तर भांडुप बोर्ली मार्गे श्रीवर्धन दुपारी १२:३० वाजता आहे.तर श्रीवर्धन बोर्ली नांनवेल मुबई सकाळी १०:०० वाजता तर मुबई नांनवेल बोर्ली  २१:३० वाजता सुटणार आहे. 
    अशी विस्तृत स्वरूपात माहिती आगार व्यवस्थापक श्री जुनेदी एम बी यांनी दिली.  
प्रवाश्यानी एस टी बसेस ने प्रवास करून आपला प्रवास सुखकर करावाअसे आव्हान श्रीवर्धन आगार व्यवस्थापक एम. बी. जुनेदी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...