गोवेली येथील कोरोना कोव्हीड अॅन्टीजेन चाचणीत पहिल्याच दिवशी सहा पैकी एक कोरोना पाॅझिटिव!
कल्याण (संजय कांबळे) : गेल्या कित्येक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर कल्याण तालुक्यातील गोवेली येथे कोरोना कोव्हीड रुग्णांची अॅन्टीजेन चाचणी कक्ष आज सुरू करण्यात आला. यामध्ये पहिल्याच दिवशी झालेल्या कोरोना कोव्हीड अॅन्टीजेन तपासणीत सहा पैकी एक पेंशंट कोरोना पाॅझिटिव आल्याने त्याला ठाणे येथील सिव्हिल हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
कल्याण तालुक्यात कोरोनाचे संकट वाढत असताना नागरिकांकडून म्हणावे तसे नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह पेंशंट ६६० इतके झाले आहेत. तालुक्यात कोरोनोच्या विरोधात लढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सर्व सोईसुविधा युक्त असे सुसज्ज हाॅस्पिटल नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. सध्याच्या काळात म्हारळ २१६, खोणी ७७,कांबा १७, गुरवली १५, बेहरे ३४,वरप ३२, रायते ७,असे आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव चे पेंशंट असून पळसोली, फळेगाव, गोवेली, आदी ग्रामपंचायत हद्दीत पेंशंट आढळून येत आहेत. गणेशोत्सवानंतर यामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या पाॅझिटिव रुण्गांच्या संपर्कात आलेल्या आणि लक्षणे दिसू लागतात अशा पेंशंट ची अॅन्टीजेन रॅपिड चाचणी तालुक्यातील गोवेली येथे सुरू करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी येथेही गर्दी केली होती. पण थोडीफार लक्षणे असलेल्या आणि त्रास होत असलेल्या ६ लोकांची कोरोना कोव्हीड अॅन्टीजेन चाचणी घेण्यात आली. यामध्ये ५ लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तर एकाचा पाॅझिटिव आला. त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. हा कर्मचारी अजून कोणाच्या संपर्कात आला आहे यांची माहीती घेण्यात येत आहे.


No comments:
Post a Comment