उशीद येथील शेतकर्यांच्या म्हशीचा विजेच्या तुटलेल्या तांरांचा शाॅक लागून तडफडून मृत्यू, अतिव दु:खाने शेतकऱ्यांनचे अन्नत्याग!
कल्याण (संजय कांबळे) बळीराजाची धनदौलत म्हणजे त्याची जनावरे, त्यावर तो पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करतो. अशा जनावरांचा त्याच्या समोर तडफडून मृत्यू झाला तर त्या बळीराजाची काय अवस्था होईल? याचा विचार न केलेला बरा! अशीच ह्रदय हेलावून टाकणारी घटना कल्याण तालुक्यातील उशीद गावात घडली आहे. विद्यूत मंडळांच्या अनागोंदी कारभारामुळे एका म्हशीला तुटलेल्या तांरांचा शाॅक लागल्याने तडफडून जीव गेला. हे उघड्या डोळ्यांनी बघितल्याने या शेतकऱ्यांने मात्र अन्नत्याग केले आहे. त्यामुळे घरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, कल्याण तालुक्यातील उशीद गावातील शेतकरी आंनता परशुराम भांगरे वय ६० वर्षे हे प्रगतीशील शेतकरी म्हणून परिसरात परिचित आहेत. काही झालं तरी काळी आई विकायची नाही. हा त्यांचा निर्णय, त्यामुळे महागाईच्या काळात शेती करणे परवडत नसताना ही ते शेती करतात व शेती सांभाळून याला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे.
उशीद गाव हे टिटवाळा शहरानजीक असल्याने व गावाच्या आजुबाजुला मुबलक चारा उपलब्ध असल्याने त्यांनी दूध व्यवसाय वाढवला. गावात काही अडचण नको म्हणून त्यांनी शेतात तबेला बांधून तेथे म्हशी ठेवल्या. आज मितीस सुमारे १५ म्हशी त्यांच्या कडे असून घरातील सर्व मुल नातवंडे हे सर्व हेच काम करत आहेत. विशेष म्हणजे अंनता भागरे यांच्या साठी हा तबेला म्हणजे गोकूळच असे, कारण ते घरी सहसा येत नसे, जनावरे सर्व काही, त्यामुळे त्यांचेवर जिवापाड प्रेम होते. मात्र काल अचानक त्यांचेवर दु:खाचा डोंगर कोसळला. कारण त्यांची लाडाची "काळू" त्यांना लडीवाळ पणे चाटत गोट्या बाहेर पडली, समोर काळ उभा होता हे दोघांनाही माहीत नव्हतं. ती गवत खात खात थोडी पुढे गेली, तर लाईटचा सिमेंट चा खाब वाकलेला व तेथून काही अंतरावर विद्यूत तार तुटून पडलेली होती. तिला धक्का लागताच काळू म्हैस धाडकन कोसळली, हा आवाज ऐकताच अंनता भागरे हे शेतकरी तिकडे धावले, त्यांच्या समोर त्यांची लाडाची काळू पाय झाडत तडफडत होती. काय करावे सुचत नव्हते. ते केवळ ओरडत होते. अरे माझ्या काळूला कुणीतरी वाचवा अशी, हद य हेलावून सोडणारी किंकाळी ऐकून त्यांची मुले घटनास्थळी आले. पण तोपर्यंत काळू ने प्राण सोडला होता. ही वार्ता विद्यूत मंडळांच्या कर्मचाऱ्यांना समजताच ते जागेवर येऊन लाईट बंद केली.
विद्यूत मंडळांच्या अनागोंदी कारभारामुळे व अक्षम्य दुर्लक्षामुळे आज उशीद गावातील भागरे या शेतकऱ्यांची म्हैस मेली, पंचनामा होईल, नुकसान भरपाई मिळेल, पण बळीराजाला झालेल्या दु:खाचे काय? कुंटूबातील एखादा माणूस गेल्यासारखे दु:ख अंनता भागरे या शेतकऱ्यांला झाले आहे, घरात कोणाशी बोलत नाही, जेवत नाही, डोळ्यांत अश्रू अशी परिस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला आहे.
या संदर्भात कल्याण पंचायत समिती चे उपसभापती रमेश बांगर यांना विचारले असता ते म्हणाले विद्यूत मंडळांचा भोंगळ कारभार सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळाल्या शिवाय मी स्वस्त बसणार नाही,


No comments:
Post a Comment