नगराध्यक्षा छाया चौधरी यांच्या पुढाकाराने मुरबाड नगरपंचायतीच्या संकुलनात हिरकणी कक्षाची स्थापना!
**महिलांना मिळाला मोठा आधार! **
मुरबाड (मंगल डोंगरे )मुरबाड हे तालुक्याचे ठिकाण असुन , मुरबाड शहरातून , मुरबाड परिसरातून किंवा मुरबाड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन मुरबाड शहरात कानानिमित्त येणाऱ्या महिलांना मुरबाड नगरपंचायतीच्या दक्ष व कर्तव्यतत्पर नगराध्यक्षा छाया चौधरी यांनी नुकतच फार मोठा आधार दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व लॉकडाऊनच्या अगोदरपासून कामानिमित्त मुरबाडमध्ये येणाऱ्या अनेक महिलांना आपल्या बरोबर असणाऱ्या बाळाला किंवा मुलाला स्तनपानासाठी नाईलाजाने मुरबाड नगरपंचायतीच्या जिन्याच्या पायऱ्यांचा वापर करावा लागत होता. या अडचणीच्या वेळी महिला मुरबाड नगरपंचायतीच्या इमारतीच्या कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानाचा वापर करत होत्या. आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी असतानाही या महिलांचा नाईलाज व्हायचा. कधी- कधी अशा महिला मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या अवती- भोवती असणाऱ्या विविध दुकानांच्या बाजूला किंवा पायऱ्यांवर बसून आपल्या अपत्याला स्तनपान करण्यासाठी आधार शोधायच्या . ही अडचण अनेक महिलांनी मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छाया चौधरी यांच्या कानावर घातली. शेवटी महिलांच्या या अडचणीची दखल घेऊन नुकतच अशा महिलांसाठी मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छाया चौधरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन नगरपंचायतीच्या कार्यालयातच हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. यावेळी मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा अर्चना विशे, नगरसेविका साक्षी चौधरी, नगरसेविका स्नेहा चंबावने, शिल्पा देहरकर, कामिनी गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.


No comments:
Post a Comment