Wednesday, 16 September 2020

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदारांची नावे आधारकार्डशी संलग्न करा !!

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदारांची नावे आधारकार्डशी संलग्न करा !!                    


'जागतिक लोकशाही दिनानिमित्त मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी'

मुरबाड (मंगल डोंगरे) :
प्रत्येक नागरिकांस भारतीय संविधानाने मतदानाचा समान हक्क प्रदान केला आहे. आपल्या भारत देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. अशा या भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना  25 जानेवारी 1950 रोजी झाली. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने बोगस व दुबार मतदारांची संख्या टाळण्यासाठी प्रत्येक मतदारांचे नाव आधार कार्डांशी संलग्न करुन मतदानाची पारदर्शकता निवडणूक प्रक्रियेत *“एक अभि व्यक्ती एक मत”* असे नियोजन आपल्या मार्फत संपूर्ण भारत देशात लागू करण्यात यावे.  जेणेकरून निवडणूक प्रक्रियेवर मतदारांचा विश्वास अधिक द्रुढ होईल, व निवडणुका अधिक पारदर्शक होतील.हिच आजच्या जागतिक लोकशाही दिनी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस मुरबाड यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोग अधिकारी यांच्या कडे मागणी करण्यात आली .यासंदर्भात मुरबाडचे नायब तहसिलदार बंडु जाधव साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...