Monday, 14 September 2020

यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही,, आमदार- किसन कथोरे, !!

यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही,,
         आमदार- किसन कथोरे, !!   
   
             
मुरबाड (मंगल डोंगरे ) : मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस दरवर्षी १९ सप्टेंबरला असतो. दरवर्षी या वाढदिवसा निमित्ताने त्यांच्या बदलापूर येथिल निवासस्थानी मोठा जल्लोष असतो . त्यांचे कार्यकर्ते ,हितचिंतक, व मतदार संघातील नागरिक तसेच त्यांच्यावर प्रेम करणारा सामान्य माणुस हजारोंच्या संख्येने जमत असतात. परंतु या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा होणार नसल्याचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथे घेतलेल्या पञकार परिषदेत आपली भुमीका मांडतान सांगितले. बदलापूर शहर ,कल्याण ग्रामिण तसेच मुरबाड तालुक्याच्या ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे अशा वातावरणात हा सोहळा साजरा करणे उचित होणार नाही. मला नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे या वर्षी १९ सप्टेंबरला बदलापूर येथिल निवासस्थानी कोणीही न येण्याचे तसेच कार्यकत्यांनी कोणतीही बॕनर बाजी आणि जाहिरातही न करण्याचे  आवाहन  यावेळी केले.                               नागरिकांनी निष्काळजी पणे न राहता आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी.   घरातून  बाहेर पडताना मास्क लावा ,सुरक्षित अंतर ठेवा , सॕनिटायझर चा वापर करा व ञास असल्यास वेळेत चाचण्या करण्याचे  या वेळी नागरिकांना सांगितले  .                  
या वेळी भाजपाचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव ,ठाणे जिल्हा ग्रामिण सरचिटणीस नितीन मोहपे , नगराध्यक्षा छायाताई चौधरी ,शहराध्यक्ष सुधिरभाई तेलवणे,यांसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...