Tuesday, 15 September 2020

वसई विरार महानगरपालिकेचे जी प्रभाग क्षेत्र कारवाई शुन्य प्रभाग क्षेत्र !!

वसई विरार महानगरपालिकेचे जी प्रभाग क्षेत्र कारवाई शुन्य प्रभाग क्षेत्र !!

"अधिकारी कारवाई करण्याचे सोडून कारणे व सबबी देण्यात तत्पर"

नायगाव : वसई विरार महानगरपालिकेच्या 'जी' प्रभाग क्षेत्राच्या अंतर्गत शहरी तसाच ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर येतो. या प्रभागात सुरवातीपासून अतिक्रमण होत असल्याने या ठिकाणी अतिशय कार्यक्षम अधिकारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र पाटील व अतिक्रमण विभागात कनिष्ठ अभियंता अजय पाववाके यांना आणले. अतिशय कार्यक्षम व हुशार अधिकारी कनिष्ठ अभियंता अजय पाववाके आल्यापासून सहाय्यक आयुक्त सुरेंद्र पाटील यांना आपली जबाबदारी ढकलण्यासाठी अजय पाववाके यांचा वापर करायला सुरुवात केली. तर कनिष्ठ अभियंता अजय पाववाके हे मुळात हुशार असल्याने कोणतेही अनधिकृत बांधकाम पूर्ण होईपर्यंत तक्रार करणाऱ्याला कारणे व सबबी सांगून झुलत ठेवणे व काम पूर्ण झाल्यानंतर आता नोटीस देतो व कारवाई करतो असे सांगणे तोपर्यंत हे अनधिकृत बांधकाम पूर्ण होऊन वापरण्यास सुरुवात झालेली असते. 
"कामण" येथील अनधिकृत बांधकाम" 


आम्ही स्वत: सहायक आयुक्त सुरेंद्र पाटील व कनिष्ठ अभियंता अजय पाववाके यांची भेट घेऊन रॉयल कंपाऊंड, कामण, भिवंडी रोडवरील अनधिकृत बांधकाम जवळपास २०,००० फुट भूमाफिया प्रदिप गुप्ता व अब्दुल यांचे याविषयी तक्रार केली होती पण ते पुर्ण होईपर्यंत कारणे देऊन आता कारवाई करण्यास सबबी देऊन टाळाटाळ करीत आहेत.
-----------------------------------------------

संग्रहित छायाचित्र :-

असेच एक बांधकाम मुख्य रस्ता अहमदाबाद हायवेवर, शेठिया इंडस्ट्रीज येथे सहज नजरेत येईल असे ४,०००/ फुट अनधिकृत बांधकाम विजय पांडे यांचे हे सुध्दा अजय पाववाके यांच्या हुशारी मुळे व सहायक आयुक्त सुरेंद्र पाटील यांच्या माहितीत या बांधकामाविषयी अनेक तक्रारी असुन वर्तमानपत्रात बातम्या लागूनही तसेच सहज अनधिकृत बांधकाम चालू आहे हे दिसत असूनही पुर्ण झाले.
आम्ही स्थानिक नागरिक, समाजसेवक, यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली असता संपूर्ण 'जी' प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून सर्व भूमाफिया व अनधिकृत बांधकाम करणारे कार्यक्षम व हुशार अधिकाऱ्यांमुळे आनंदात आहेत व सर्व सामान्य नागरिकांना फसवणूक व मनस्तापाला सामोरे जावे लागते. तरी आयुक्त स्वतः लक्ष देऊन अशा हुशार अधिकाऱ्यांचे कौतुक करुन जी अनधिकृत बांधकामे 'जी' प्रभाग क्षेत्रात उभी राहिली आहेत (अहमदाबाद हायवेवरील शेठिया इंडस्ट्रीज येथील अनधिकृत बांधकाम, किंवा रॉयल कंपाऊंड कामण येथील बांधकाम तसेच इतर) यांच्या वर तात्काळ कारवाई करुन निष्कासित करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...