Sunday, 6 September 2020

शिक्षक दिना निमित्त चोपडा रोटरी तर्फे नेशन बिल्डर्स अवॉर्ड, १६ शिक्षक सन्मानित. !!

शिक्षक दिना निमित्त चोपडा रोटरी तर्फे नेशन बिल्डर्स अवॉर्ड,  १६ शिक्षक सन्मानित. !!



चोपडा वार्ताहर :
  रोटरी क्लब चोपडा ने ५ सप्टेंबर, २०२० रोजी चोपडा रोटरी शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड २०२०'  देऊन त्यांचा सत्कार केला. शिक्षकांनी दिलेल्या सेवेसाठी रोटरी इंडिया लिटरेसी मिशन (आरआयएलएम) चा हा उपक्रम आहे.  विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन राष्ट्र निर्मितीत मोलाचे कार्य करणाऱ्या अश्या शिक्षकांना रोटरी तर्फे सन्मानित करण्यात येते, 


  कोरोना मूळे या वर्षी हा पुरस्कार दोन टप्यात देण्यात येणार आहे सुरवातीला रोटरी परिवारातील शिक्षक तर दुसऱ्यात टप्यात तालुक्यातील शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे असे रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कळवले आहे.
  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चोपडा येथील ज्येष्ठ आदर्श शिक्षक श्री अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवॉर्ड ने सोळा शिक्षकांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्यात सौ आशा वाघजाळे, सौ सुरेखा मिस्त्री,भालचंद्र पवार, गौरव महाले, हरिश्चंद्र अग्रवाल,लक्ष्मण एन. पाटील,महेंद्र बोरसे, पंकज पाटील, प्रीती पाटील,राधेश्याम पाटील, विलास पाटील, सुनिता पाटील, संध्या गुजराथी, एम. डब्ल्यू पाटील,ईश्वर सौदांनकर, रमेश वाघजाळे  अशा सोळा शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
  श्री.अशोक सोनवणे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांचे समाजातील महत्त्व व राष्ट्र निर्मितीत असलेले त्यांचे  योगदान किती मौल्यवान आहे हे सांगितले.
  कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक एन. सोनवणे, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव,सचिव रुपेश पाटील, शिक्षक प्रतिनिधी मुरलीधर पाटील, प्रकल्प प्रमुख पृथ्वीराज राजपूत यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व पॉल हॅरिस व सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.
  श्री राधेश्याम पाटील, सौ आशा वाघजाळे, गौरव महाले व संध्या गुजराथी यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय विलास पाटील सर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुपेश पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...