न्यू इंग्लिश स्कुल विद्याल मुरबाड याने गरीब विद्यार्थ्यांची फि माफ करावी .. *मनसेची मागणी **
मुरबाड {मंगल डोंगरे} : कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र उद्योग धंदे बंद झाले ते आजतागायत बंदच आहेत. अनेक पालकांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत . चालु शैक्षणिक वर्षे सुरु होत असतांना शाळा काॅलेजची फी भरण्याची सर्व सामान्य माणसाची मारामार झालेली आहे . अशा वेळी मुरबाड शहरातील नामांकित विद्यालय न्यू इंग्लिश स्कुल या विद्यालयाने गोरगरीब , मागास विद्यार्थ्यांची चालु वर्षाची फी माफ करुन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी मागणी मनसेच्या मुरबाड शहर शाखेचे अध्यक्ष नरेश देसले , सागर भंडारी , मोहन कराळे , कैलास खरे , संदीप गोतावले यांनी निवेदन देऊन केली आहे .
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या कोराना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत . हातावर पोट असणा-यांची तर कठीण परीस्थिती झाली आहे. . त्यातच मुलांचे शिक्षण सुरु असल्याने त्यांची शैक्षणिक फी भरण्याचा प्रश्न पडला आहे. या प्रसंगात मुरबाड शहरातील न्यू इंग्लिश स्कुल या नामांकित विद्यालयाने मागासवर्गिय , गोरगरीब विद्यार्थांची चालु वर्षासाठी फी माफ करावी अशी मागणी मनसेने शाळा व्यवस्थापन समितीकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

No comments:
Post a Comment