आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसा निमित्त नगरसेविका साक्षीताई चौधरी यांचा अनोखा उपक्रम !
**शासकीय कोविड सेंटर मधील डॉक्टरांचा केला गौरव**
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी आपला वाढदिवस कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर साजरा न करण्याचे ठरविल्याने, त्या अनुषंगाने मुरबाड मध्ये आ.कथोरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने मुरबाड नगर पंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका साक्षीताई चौधरी व समाजसेवक संतोष(बाबू)चौधरी यांनी अनोखा उपक्रम राबवला असुन त्यांनी कोरोना संकटात अनेक रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कोरोना योध्यांचा सन्मान केला आहे.आपला जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावणाऱ्या शासकीय कोविड केअर सेंटर मधील डॉक्टर आणी कर्मचाऱ्यांचा त्यांनी यथोचित गौरव केला.
कोरोना संकटात नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या नगरसेविका साक्षीताई चौधरी यांची जनतेप्रती असलेली तळमळ कोरोना संकट काळात दिसून आली. त्या मुळे आपल्या 'हक्काची नगरसेविका' म्हणून नागरिकांनी त्यांचा बहूमान केला आहे.मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी व समाजसेवक संतोष (बाबू) चौधरी यांनी शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या डॉक्टर आणी कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव केला. त्याच कोविड सेंटर मध्ये ऍडमिट असणाऱ्या कोरोना बाधीत रुग्णांच्या साठी त्यांनी मोठा एलईडी टिव्ही संच व फ्री वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यप्रसंगी भाजपा मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव सर, भाजपा ठाणे जिल्हा ग्रा.महिला आघाडी अध्यक्षा शीतलताई दिनेश तोंडलीकर,भाजपा ठाणे जिल्हा ग्रा.सरचिटणीस नितिन मोहपे सर, भाजपा मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर भाई तेलवणे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment