Tuesday, 22 September 2020

कोरोनाची दाहकता, महिन्याला ऐंशी ते शंभर दशक्रिया, नदी काठावरील गर्दी हटेणा?

कोरोनाची दाहकता, महिन्याला ऐंशी ते शंभर दशक्रिया, नदी काठावरील गर्दी हटेणा?



कल्याण (संजय कांबळे) : कोरोनोच्या धसक्याने आणि इतर कारणांमुळे मृत्यू पावलेल्या ची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या उल्हास नदीच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर कांबा पाचवामैल येथे घाटावर दररोज ४/५ दशक्रिया विधी म्हणजे महिन्याला सुमारे ८० ते १०० दसपिंड विधी कार्यक्रम उरकले जातात यावरून कोरोनाची दाहकता लक्षात घेऊन नागरिकांनी सजग राह्याला पाहिजे.


साधारण पणे मे २०२० पासून कल्याण तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया देश विदेशातील कोरोनाच्या बातम्या देऊन वातावरण निर्माण झाले. दररोज च्या बातम्यांमध्ये कोरोनोच्या वाढत्या संकटाची जाणीव करून देऊन काय काळजी घ्यायची याचीही माहिती दिली. परंतु सोशलमिडयावर व्हायरल होत असलेले विविध व्हिडिओ बातम्या यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची थोडीफार प्राथमिक लक्षणे दिसू लागली तरी अनेकांचा घाबरून हद् य विकारांच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर कित्येकांनी रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्या. त्यामुळे अधिकाधिक भितीदायक वातावरण पसरले आहे. शासनाने लाॅकडाऊण, सॅनिटायझर चा वापर, मास्क, सोशलडिस्टींग, अॅन्टीजेन चाचणी, आदी उपाययोजना सुरू केल्या. परंतु अनलाॅक नंतर कोरोना चे संकट वाढले. गणेशोत्सवाने यात भरच पडली. ऐकट्या कल्याण तालुक्याचा विचार केला तर म्हारळ वरप कांबा या मोठय़ा लोकसंख्येच्या गावासह इतर अनेक गावात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची कमी अधिक आकडेवारी आहे. तालुक्यात आता ९० वर ही संख्या पोहचली आहे. 
यामध्ये पोलीस, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, महसूल कर्मचारी इतर सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचारी तसेच नागरीक यांचा समावेश आहे तर अजूनही अॅक्टिव रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना कोव्हीड मुळे मृत्यू झालेल्या पेंशंट चे मृतदेह शकतो दिले जात नाही. त्यामुळे नातेवाईक त्यांचे दशक्रिया विधी नदीच्या काठावर असलेल्या गणेश घाटावर करतात. कल्याण तालुक्यात कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पाचवामैल येथील सिध्देश्वर मंदिर घाट, रायते येथील उल्हास नदी काट, आपटी संगम, खडवली भातसा नदी, टिटवाळा रुदा काळू नदी, मुरबाड मध्ये संगम, धानिवली, तर शहापूर मधील गंगा गोरेश्वर चिखले अंबार्जे पुलाजवळ वाशिंद जवळील भातसा नदी काठ आदी ठिकाणी दशक्रिया विधी पार पाडले जातात. कांबा येथील सिध्देश्वर मंदिर घाट येथे दररोज ४/५ असे महिन्याला ८०/१०० दशपिंड उरकले जातात. गेल्या ५महिन्यात ५०० ते ७०० असे विधी येथे झालेले आहे. तर शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यात किती झाले असतील याचा विचार करून प्रत्येकाने कोरोना ला मुळीच हलक्यात घेऊ नये. कारण शासनाने सुरू केलेली माझे कुंटूब माझी जबाबदारी यामुळे कोरोना चे उच्चाटन होईल असे वाटते. त्यामुळे आपण देखील आपला सहभाग या मोहिमेसाठी द्यायला हवा.लक्षणे दिसताच आरोग्य विभागाला माहिती दिली पाहिजे. अन्यथा गावोगावी लागलेले "श्रध्दांजली" चे बॅनर हटणार नाहीत.ते हटवायचे असतील तर आपण "शुभेच्छूक कसे बणू याचा विचार करायला हवा.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...