Thursday, 1 October 2020

स्वच्छता मोहिमेत मुरबाड नगर पंचायत पुन्हा एकदा ठरली अव्वल !!

स्वच्छता मोहिमेत मुरबाड नगर पंचायत  पुन्हा एकदा ठरली अव्वल !!                      


शहरात **मि पण स्वच्छताग्रही मोहिमेचा शुभारंभ **


मुरबाड (मंगल डोंगरे) : मा.पंतप्रधान यांनी देशाच्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत भागीदारी वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे. नुकताच स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेत मुरबाड नगरपंचायतीने *देशात पश्चिम विभागात 54 वा व राज्यात 37 वा* क्रमांक पटकाविला आहे. 2 ऑक्टोबर 2020 हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 151 वी जयंती साजरी होत असतानाच त्या सोबतच स्वच्छ भारत मिशनचा ६ वा  वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे . त्या अनुषंगाने नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत *कचर्‍याचे वर्गीकरणाबाबत जनजागृती उपक्रम* मुरबाड नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत मुरबाड नगरपंचायत कार्यक्षेत्रात घरोघरी भेट देऊन ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे व स्वच्छतादूत/ स्वच्छताग्रही यांनी प्रभागनिहाय स्थानिक नगरसेवकांच्या सहभागाने घरोघरी भेटी देऊन स्वच्छता विषयक मार्गदर्शनपर माहितीपत्रकाचे वाटप करणे योजिले आहे.त्यात  *‘मी पण स्वच्छताग्रही’* या मोहिमेचा शुभारंभ मा.आमदार किसन कथोरे साहेब,नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी, मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ, उपनगराध्यक्ष सौ. अर्चना विशे, आरोग्य सभापती श्री.नारायण गोंधळी व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर स्वच्छता मोहिमेस सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...