मुरबाड -- (मंगल डोंगरे) : आगामी येणारी मुरबाड नगरपंचात निवडणुक व तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका डोळ्या समोर ठेवून मुरबाड तालुका व शहर अशा दोन्ही ठिकाणी भा.ज.पा.ने विविध आघाड्या, मोर्च, अशा पदांवर कार्यकर्त्यांची निवड केली असल्याने तालुक्यात कार्यकर्त्यांंमधे जोश व उत्साह दिसून येत आहे. मुरबाड नगरपंचातचा कालावधी येत्या ३१ आॕक्टोंबर मध्ये संपुष्टात येत आहे. तेव्हा निवडणुक आयोग केव्हाही निवडणुकीची घोषणा करु शकतो. त्यामुळे शहराची पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाला अधिक बळकटी येण्यासाठी खासदार कपिल पाटील व ठाणे जिल्हा ग्रामिणचे अध्यक्ष तथा आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रभाग निहाय पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. तर गेले सहा महिने कोरोना सारख्या महाभयंकर संकटात नगराध्यक्ष पदाचा कारभार अत्यंत संयमाने व हूशारीने सांभाळणार्या विद्यमान नगराध्यक्षा छायाताई चौधरी यांच्यावर मुरबाड शहर महिला आघाडी च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन वरिष्ठांनी त्यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना समाजकार्यासाठी अधिक जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.मात्र कोरोनासंकटात त्यांनी मुरबाड शहरासाठी अतिशय धिरोक्त व उल्लेखनीय काम केले आहे. लाॕकडाऊन मध्ये गरजु व आदिवांसीना अन्नधान्याचे वाटप, मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शाहरातील स्वच्छता, सॕनिटायजरींग फवारणी, मछ्चर फवारणी, बाजारपेठ बंदचे निर्णय, असे अनेक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले गेले. प्रसंगी स्वतः रस्त्यावर उतरुन कामे केली तसेच शांत व संयमीपणाने सर्वाना सोबत घेऊन जाणाऱ्या असल्याने पक्षाने पून्हा एकदा महिला शहर अध्यक्ष पदी निवड केल्याने त्यांचे सर्वञ कौतुक व अभिनंदन होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!
संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...

No comments:
Post a Comment