विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !!
मुंबई(शांत्ताराम गुडेकर/ गणेश हिरवे) :
संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज महराष्ट्रा राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पेठ येथे नुकताच मार्च २०२० मध्ये दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिंपी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. संत नामदेव महाराजांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पांडुरंग नाझरे व विनायक तांदळे यांनी विधार्थीना मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानपत्र, पेनसेट, गुलाबाचं फुल व फेटा बांधून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष विनायक तांदळे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश भांबुरे-पेठ शिंपी समाज अध्यक्ष, ज्ञानेश्वर पेठकर-माजी सरपंच, नामदेव भांबुरे, अमोल मिरजकर, माऊली पेठकर, पुंडलिक गोंदकर, कुमार वर्ण, बाळासाहेब डंबे, विकास पेठकर,डॉ सुभाष भांबुरे, माणिक भांबुरे, धनंजय पेठकर, माणिक भांबुरे आदी समाजबांधवांनी खूप मेहनत घेतली.कार्यक्रमाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी पुरुषोत्तम तांदळे यांनी उचलली होती, तेव्हा त्यांचेही संस्थेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंग पाळून हा कार्यक्रम घेण्यात येऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment