Monday, 19 October 2020

मुंबईच्या डब्बेवाल्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याहस्ते सन्मान व सायकल भेट !

मुंबईच्या डब्बेवाल्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याहस्ते सन्मान व सायकल भेट !


मुंबई (शांत्ताराम गुडेकर ) :
        घाटकोपरच्या श्री साई श्रद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तसेच भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शुभ्रंशु दीक्षित यांच्या वतीने मुंबईच्या डब्बेवाल्यांना मोफत सायकल वाटप व सन्मान कार्यक्रम आज १९ ऑक्टो रोजी राजभवन येथे पार पडला.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईच्या डब्बेवाल्याचा सन्मान व त्यांना मोफत सायकल वितरित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 


मुंबईच्या विविध क्षेत्रातील कार्यालयात अन्नाचा डब्बे पोहोचवण्याचे कार्य मुंबईचे डबेवाले करत असतात. मुंबईची बेस्ट , लोकल ने त्यांचा प्रवास असतो तर काही परिसरात डब्बेवाले सायकल ने डब्बा पोहीचवतात. मुंबईच्या या डब्बेवाल्यानी कोरोना काळात अनलॉक मध्येही त्यांनी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली . त्यांचा सन्मान राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करत त्यांना सायकल भेट देण्यात आल्याचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शुभ्रंशु दिक्षित यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...