Monday, 19 October 2020

शेतक-यांच्या नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करण्यास कल्याण तालुक्यातील ग्रामसेवकांचा नकार ! शेतकऱ्यांमधे संताप?

शेतक-यांच्या नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करण्यास कल्याण तालुक्यातील ग्रामसेवकांचा नकार ! शेतकऱ्यांमधे संताप?


कल्याण (संजय कांबळे) : कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे बाजारपेठा बंद झाल्याने बळीराजा देशोधडिला लागला असताना हातातोंडाशी आलेले भातपीक परतीच्या पावसाने डोळ्यादेखत मातीत कालवले, त्यामुळे पुरता नागडा झालेल्या शेतक-याला एकच आशा उरली होती ती म्हणजे आपल्या नुकसानीचे पंचनामे होतील व मायबाप सरकारकडून काहीतरी मदत मिळेल, पण यावरही ग्रामसेवकांनी नांगर फिरवला असून आम्ही पंचनामे करणार नाही असे निवेदनच कल्याण तहसीलदार दिपक आकडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांना दिले असून यामुळे शेतक-यामध्ये मात्र कमालीचा संताप पसरला आहे. 


कोरोनामुळे गावोगावचे आठवडे बाजार बिर्लागेट, कल्याण येथील मार्केट बंद होते, यामुळे शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला व इतर वस्तू अक्षर:श फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली होती, तरीही कर्जबाजारी होऊन कशीतरी भात लावणी पुर्ण केली, शासनाच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या बियाणे, अवजारे, खते व इतर साहित्याच्या आधारावर भात लावणी उरकून घेतली, मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे गावोगावचे पिक देखील उत्तम आले होते, कोरोनाच्या संकटामुळे भाजीपाल्यात नुकसान झाले असले तरी यंदा भातपीक चांगले आल्याने बळीराजा थोडाफार आंनदात होता. पण कोरोनात जवळचे, सगेसोयरे, मित्र नातेवाईक, कुंटूबातील सदस्य मृत्यू पावल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता, यातूनही सावरून तो दिवाळी, दसरा तोंडावर आल्याने तो तयार झालेल्या भाताची कापणी करण्याच्या तयारीत होता यासाठी बाद बनविने, भारे वाहण्यासाठी मजूरांची जमवाजमव करने, आदी कामात मग्न होता आणि घात झाला परतीच्या पावसाने असा काय तडाखा दिला की अख्खे उभे भात आडवे झाले, कल्याण, मुरबाड, शहापूर, वाडा, भिंवडी, अंबरनाथ,असे सर्वच ठिकाणी शेतक-याचे अतोनात नुकसान झाले, गेल्या कित्येक दिवसापासून भात पाण्यात असल्याने कुजू लागले आहे. या आस्मानी संकटामुळे शेतक-याचे कंबरडे मोडले आहे आधीच कोरोनाच्या महामारीत शेतक-यांचे सगेसोयरे अँडमिट आहेत, काही वाचलेत, तर काहीनी आपला जीव गमावला आहे, त्यामुळे अश्या संकटकाळात शेतक-यांना आधार देणे गरजेचे आहे, त्यामुळे शासनाकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचे नुकसान पंचनामे सुर झाले आहेत यामध्ये महसूल विभागाचे तलाठी, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक व जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. 
परंतू अशा अडचणीच्या व संकट काळात प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी बळीराजाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न ग्रामसेवकांनी सुरू केला आहे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम आम्ही नाकारत असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, कल्याण तालुका शाखा यांनी कल्याण तहसीलदार दिपक आकडे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांना दिले आहे, यामुळे तालुक्यातील शेतक-यांनी ग्रामसेवका विरोधात संताप व्यक्त करुन अंत्यत तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसे पाहिले तर ग्रामसेवकावर अन्याय होतोय हे खरे असले तरी अंदोलनाची ही वेळ नक्कीच नाही शिवाय त्यांच्याकडे मागील वर्षीचा डाटा तयार आहे,७/१२आहेत खातेदार आहेत, क्षेत्र आहे‌ जास्तीतजास्त एक किंवा दोन तासांचे काम आहे तसेच सर्वच कर्मचारी किंवा ग्रामसेवक हे शेतक-यांची मुले असणार, असे असताना पंचनामे न करण्याचा निर्णय म्हणजे, सर्व घटकांचा रोष ओढाऊन घेण्यासारखा आहे यात शंका नाही. 
अगोदरच विविध संकटांनी शेतकरी त्रासला आहे,त्यातच या निर्णयामुळे तूम्ही शेतक-याच्या संतापाला सामोरे जाताय याचा निट विचार व्हावा ऐवढीच अपेक्षा !!


"राजेश नार्वेकर (जिल्हाधिकारी, ठाणे) सध्या शेतकरी भंयकर अडचणीत आहेत,शासनाकडून पंचनामे सुरु आहेत. हे पंचनामे विहित मुदतीत होणे गरजेचे आहे, तरच त्यांना वेळीच मदत करता येईल, या अंदोलनामुळे त्यास विलंब होईल, पर्यायाने शेतक-यांना वेळीच मदत मिळणार नाही हे योग्य नाही याचा त्यानी विचार करावा"                                
'श्री पवार (डेप्यूटी सीईओ, जि प ठाणे) ही अंदोलनाची वेळ नाही हे शासनाचे संयुक्तीक काम आहे,तलाठी,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यामध्ये आहेत त्यांना हे काम करावेच लागेल,                    

'वाळकू भोईर (शेतकरी) ग्रामसेवक असो अथवा कोणीही कर्मचारी यांनी आमचा अंत पाहू नये.

"उदय शेळके (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, ठाणे) शासन निर्णयानुसार आम्ही तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक असे सयुक्त पंचनामे करणार पण तहसीलदारांनी जी ग्रामसेवकावर स्वतंत्र जबाबदारी टाकली आहे त्याला आमचा विरोध आहे."

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...