==================मुरबाड ( मंगल डोंगरे ) नुकताच भारतीय जनता पार्टीने सर्वच स्तरावरील पदनियुक्त्या करून संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह तालुक्यातील आणि शहरातील पदांच्या नियुक्त्या करून मोठ्या प्रमाणात नवतरुणांना संधी देवुन पक्षवाढ व आगामी नगरपंचायत व ग्राम पंचायती ताब्यात ठेवण्यासाठी रणनिती आखली आहे. याच पदनियुक्त सोहळ्यात मुरबाड शहरातील तरुण -तडफदार आणि धडाडीचे कार्यकर्ते अतुल देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा युवा मोर्चाच्या मुरबाड शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. आणि त्यांच्या समाज कार्याला सुरुवात झाली. कुठल्याही कामाची सुरुवात करताना थोरा-मोठ्यांच्या आणि गोरगरीब गरजुंचे आशिर्वाद फार महत्त्वाचे असतात. म्हणून कि काय अतुल याने तात्काळ मुरबाड शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले.या शिबिराचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करून आपल्या समाज सेवेचा श्रीगणेशा सुरु केला.आणि बघता बघता ;शेकडो गरजुंनी याचा लाभ घेतला."जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले"या संतांच्या युक्ती प्रमाणे दुर आणि द्रुष्टी ठेवून त्याची सेवा सुरु झाली आहे. या कार्याचे सर्वांकडून कौतुक ही होत आहे. या शुभारंभ शिबीराचे उद्घाटन प्रसंगी आ.किसन कथोरे ;भाजपा मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंतजी सूर्यराव सर,जिल्हा सरचिटणीस नितीनजी मोहपे सर,सभापती श्रीकांतजी धुमाळ,भाजप शहराध्यक्ष सुधीरभाई तेलवणे,मा.शहराध्यक्ष रुपेशजी गुजरे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिपकजी खाटेघरे,खंडू दादा मोरे,युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस मा.जयवंतजी हरड,मा.नगराध्यक्षा शितलताई तोंडलीकर,मा.नगराध्यक्ष मा.किसनजी कथोरे,मा.नगराध्यक्ष मा.मोहनजी सासे,मा.नगराध्यक्ष मा.वैभवजी भोसले,नगरसेवक मा.संतोषजी कोळेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मा.चेतनजी घुडे,मा.ज्योतीताई गोडांबे,भाजपा शहर सरचिटणीस मा.महेंद्रजी पवार,कामगार आघाडी अध्यक्ष मा.प्रदीपजी गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष मा.रियाझभाई शेख,भटके जाती जमाती अध्यक्ष बापू मोहिते,जेष्ठ नेतेे मा.लियाकतजीे शेख सर,मा.नंदाभाऊ रोठे,मा.सुनीलजी घागस,मा.अनिलजी ठाकरे
यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment