Monday, 26 October 2020

दसरा सणाला सोन्या सोबत मास्क वाटुन ज्योती ताईंनी घेतली गावकऱ्यांची काळजी !!

दसरा सणाला सोन्या सोबत मास्क वाटुन ज्योती ताईंनी घेतली गावकऱ्यांची काळजी !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : "दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा" ही म्हण वर्षांनुवर्ष पुर्वपार परंपरेने चालत आली आहे. आणि आजही चालत आहे. मात्र यंदाच्या कोरोना संकटाने सर्वसण उत्सव यावर पाणी फेडले आहे. 


प्रत्येक जण आपापल्या जिवाची काळजी घेऊन जगण्याचा प्रयत्न करत आहे. या संकटात यंदाचा दसरा हा सण दु:खात आणि कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली साजरा झाला.यावेळी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे. 


मात्र या प्रथेला बाजूला सारत; भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्या ज्योती ताई गोडांबे यांनी "माझं गाव माझी जबाबदारी " समजून आपल्या मुरबाड तालुक्यातील कळंभे गावात घरोघरी आपट्याच्या पानांसोबत (सोन्या) मास्कचे वाटप करून आपल्या गावातील ग्रामस्थांची काळजी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पती आदर्श  आणि उपक्रमशिल शिक्षक भालचंद्र गोडांबे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...