शारदा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज कजगाव येथील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !!
कजगाव, प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्था हिंगोणे खुर्द संचलित शारदा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज कजगाव विद्यालयातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित फेब्रुवारी 2020 शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी च्या एकूण दोन विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. त्या विद्यार्थिनींची नावे अशी, रिद्धी महेंद्र पाटील व मानसी तात्यासिंग सूर्यवंशी आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थिनींना विद्यालयातील शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. दोघही पात्र विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. सुनील चव्हाण सर व संस्थेचे सचिव माननीय श्री. नंदन चव्हाण सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. निलेश मोरे सर व सेमी इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री. प्रदिप कुमावत सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालकांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

No comments:
Post a Comment