Tuesday, 10 November 2020

मुरबाड नगरपंचायत प्रभाग निहाय आरक्षण जाहीर ? ** अनेकांचा पत्ता गुल **

मुरबाड नगरपंचायत प्रभाग निहाय आरक्षण जाहीर  ?
** अनेकांचा पत्ता गुल **


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड नगरपंचायत पहिली पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली असून पुढील सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, ना.मा.प्र. महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी आज मुरबाड मध्ये प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. सदर प्रभाग व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक 10/11/2020 रोजी एमआयडीसी हॉलमध्ये पार पडला. 


सदर कार्यक्रमात प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्री अभिजीत भांडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे अध्यक्षतेखाली व तहसीलदार अमोल कदम यांचे व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात प्रभाग निहाय आरक्षण बदलल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांचा पत्ता गुल झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असलेल्या नवरदेवांना एकभावी नगरसेवक बनण्यापासुन पराव्रुत्त व्हावे लागले आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमध्ये वेगळ्या हालचालीना वेग आला आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व 26 नोव्हेंबर पर्यंत तीन वाजेपर्यंत नागरिक हरकती व सूचना सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात "प्रभाग क्रमांक 1 एमआयडीसी नागाचा खडक सर्वसाधारण महिला प्रभाग" *क्रमांक दोन लांबची वाडी खरवाडी डोळ्याचा पाडा विद्यानगर देवदर्षण सोसायटी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला** *प्रभाग क्रमांक तीन शेळके पाडा माता नगर फॉरेस्ट कॉलनी सर्वसाधारण** **प्रभाग क्रमांक 4 साई संसार कॉलनी,म्हसा रोड परिसर, बाजारपेठ, खडक बाण वाडा अण्णाभाऊ साठे नगर अनुसूचित महिला ****प्रभाग क्रमांक पाच संभाजी नगर हनुमान मंदिर सर्वसाधारण महिला ** प्रभाग क्रमांक सहा हनुमान आळी, मुस्लिम मोहल्ला रोहिदास वाडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर,ना.मा.प्र. महिला "प्रभाग क्रमांक 7 ताड आळी ,देवीची आळी, ज्ञानदीप नगर, ना. मा.प्र.महिला ** प्रभाग क्रमांक 8 माता नगर ,डाकबंगला, अरुणोदय सोसायटी, ताड आळी,** सर्वसाधारण ** & प्रभाग क्रमांक 9 सोनारपाडा, माता नगर, गणेश नगर, ना.मा.प्र. महिला ** प्रभाग क्रमांक 10 सोनारपाडा ""सर्वसाधारण "" प्रभाग क्रमांक 11 गणेश नगर, देवीची आळी ,""सर्वसाधारण "" प्रभाग क्रमांक 12 त्रिनयना इमारत, माळीनगर ,*सर्वसाधारण * "प्रभाग क्रमांक 13 शंकर मंदिर, उगळेआळी, भदेवाडा, वैश्य समाज हॉल, बाजारपेठ, ना.मा.प्र. सर्वसाधारण ** ""प्रभाग क्रमांक 14 खोत आळी, सोनार आळी, बाजार पेठ, जैन मंदिर, *सर्वसाधारण * "प्रभाग क्रमांक 15  माऊली नगर, तोंडलीकर नगर, संभाजी नगर, बागेश्वरी नगर, *सर्वसाधारण महिला* *प्रभाग क्रमांक 16 संभाजीनगर, कुंभारवाडा, पाच आंबा, गोड्या चा पाडा, क्रांती टाँकीज, राम मंदिर परिसर,,** *अनुसूचित जमाती महिला* *प्रभाग क्रमांक 17 शास्त्रीनगर मार्के पाडा सर्वसाधारण महिला **अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झाले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...