Sunday 27 December 2020

सोमवार पासून ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उडणार 'धुरळा'?

सोमवार पासून ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उडणार 'धुरळा'?

कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील एकूण ४६ ग्रामपंचायतीपैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून पहिल्या दिवशी एकही अर्ज सादर झाला नसला असला तरी दुसर्‍या दिवशी १२ उमेदवारांनी अर्ज भरले मात्र सलग तीन दिवस सुटी असल्याने एकाही उमेदवाराला अर्ज भरता आला नाही. परंतु उद्या म्हणजे सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडणार आहे त्यामुळे बिनविरोध निवड अवघड होऊन बसली आहे.
कल्याण तालुक्यातील एकूण ४६ ग्रामपंचायतीपैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये कल्याण ग्रामीण भागातील २१ तर शहरी भागातील ५ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये म्हारळ वरप कांबा रायते, मानवली, घोटसई, म्हसकळ, निंबवली मोस, गुरवली, गोवेली, सांगोडा वासुद्री कोंढेरी, वाकळण, आदीचां समावेश आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र १२ अर्ज सादर झाले यांनतर नाताळ व इतर सुट्ट्या लागल्या. आता सोमवारी उमेदवारी भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.
काही गावांमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल करण्या अगोदरच प्रचाराला सुरुवात केली आहे. तर काही नेते व कार्यकर्ते ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु काही मंडळींच्या आडमुठय़ा धोरणामुळे व घाणेरड्या राजकारणामुळे जो तो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहेत.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...