कल्याणातील अत्रे रंगमंदिराचा पडदा उघडला !
कल्याण, (ऋषिकेश चौधरी) :
कोरोना लॉकडाउन काळात मार्च पासून इतर सर्व गोष्टीबरोबरच बंद झालेली नाटकाची थीएटरचा पडदा 9 महिन्या नंतर उघडला. सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन करत थीएटरमध्ये नाटकाचे प्रयोग करण्यास राज्य शासनाने आणि पालिका प्रशासनाने परवानगी दिली असून पालिका प्रशासनाने देखील नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सवलत दिली आहे.
यामुळेच हळूहळू नाटकासारख्या जिवंत माध्यमाचा आस्वाद नागरिकांना घेता येणार असून मागील 8 महिने विविध प्रकारे प्रेक्षकाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार्या कलाकारांना थेट प्रेक्षकाच्या प्रतिसादाचा आस्वाद घेता येणार आहे. आज मुंबई रिजन मधील पहिल्या शोचा मान मिळालेल्या कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात होणार्या तू म्हणशील तसं नाटकाच्या अभिनेते संकर्षण याने याचा आनंद व्यक्त करताना तिसऱ्या घंटेची प्रतीक्षा संपल्याचा आनंद वेगळाच असल्याचे म्हटले आहे. 9 म्हीन्यानतर स्टेज वर उभे राहत असून या माध्यमाची मजा वेगळीच असून प्रेक्षकाची दाद प्रत्यक्ष मिळत असल्याने आनंद वाटतो. सुरक्षित वावराच्या नियमाचे सर्व प्रकारे पालन या नाट्यगृहात केले जात असल्याने मनोरंजन हि देखील जीवनावश्यक गोष्ट असल्याने नाटकाचा कोणतीही भीती न ठेवता मनमुराद आनंद घ्या असे आवाहन प्रेक्षकांना केले आहे. तर या नातकासाठी नाट्य रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला .
या नाटकाला पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सपत्निक हजेरी लावली होती .यावेळी नाट्य कलाकार
संकर्षण कऱ्हादे यानी आयुक्तांचे आभार मानत त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले .तब्बल 9 महिन्यांनी नाट्यगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना सेल्फी चा मोह आवरला नाही .कोरोनाचे नियनांचे पालन करत नाट्यरसिकांनी नाटकाचा आस्वाद घेतला


No comments:
Post a Comment